शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव शहरातील लॉजमध्ये सेवानिवृत्त शिक्षकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 20:01 IST

व्यसनामुळे पत्नीशी सातत्याने वाद होत असल्याने भजे गल्लीतील लॉजमध्ये वास्तव्याला असलेले धनंजय शंकरराव भदाणे (रा.विद्या नगर, पिंप्राळा, जळगाव) या सेवानिवृत्त शिक्षकाचा शनिवारी मृत्यू झाला. मृत्यूचे कारण स्पष्ट झालेले नाही. याबाबत जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे मृत्यूचे कारण अस्पष्टपत्नीशी भांडण झाल्याने सोडले होते घर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद

आॅनलाईन लोकमतजळगाव दि,३ : व्यसनामुळे पत्नीशी सातत्याने वाद होत असल्याने भजे गल्लीतील लॉजमध्ये वास्तव्याला असलेले धनंजय शंकरराव भदाणे (रा.विद्या नगर, पिंप्राळा, जळगाव) या सेवानिवृत्त शिक्षकाचा शनिवारी मृत्यू झाला. मृत्यूचे कारण स्पष्ट झालेले नाही. याबाबत जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, भदाणे हे १ जानेवारीपासून भजे गल्लीतील सुशांत लॉजमध्ये राहायला आले होते. लॉजचे दररोज ते भाडे  देत होते. त्यामुळे लॉजचा कर्मचारी शनिवारी त्यांच्या खोलीत गेला. आतून दरवाजा बंद असल्याने कर्मचा-याने दरवाजा ठोठावला. मात्र प्रतिसाद मिळत नसल्याने या कर्मचा-याने व्यवस्थापक मेघराज नाईक यांना ही माहिती दिली. त्यांनी जिल्हा पेठ पोलिसांना कळविल्यानंतर उपनिरीक्षक कविता भुजबळ व सहका-यांनी घटनास्थळी भेट दिली. बेशुध्दावस्थेत असलेल्या भदाणे यांना जिल्हा रुग्णालयात हलविले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले.भदाणे यांचा ह्दयविकाराने मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. भदाणे यांना मयूरी ही एक मुलगी असून ती विवाहित असून बेंगलोर येथे वास्तव्यास आहे. लहान बंधू राजेंद्र भदाणे हे औरंगाबाद येथे  आहेत. गेल्या वर्षी धनंजय भदाणे यांना न्यूमोनिया झाला होता. महिनाभर दवाखान्यात राहिल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मद्यपान तसेच सिगरेट न घेण्याच्या सुचना केल्या होत्या. याच विषयावरून पती आणि पत्नीमध्ये मतभेद होत असायचे. त्यामुळे धनंजय भदाणे हे लॉजमध्ये थांबून त्यांनी मद्यपान सुरू ठेवले होते.