शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

मासेमारीसाठी गेलेल्या प्रौढाचा सर्पदंशाने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2018 01:12 IST

पाचोरा तालुक्यातील वेरूळी येथील रहिवासी असलेला ५५ वर्षीय प्रौढ इसम मासेमारीसाठी बहुळा प्रकल्पावर गेला असता त्याला सर्पदंश झाला. जळगाव जिल्हा रुग्णालयात उपचार घेतांना त्याचा मृत्यू झाला.

ठळक मुद्देघटनेप्रकरणी पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंदआठ रोजी घडली सर्पदंशाची घटना

पाचोरा : वेरुळी खुर्द ता. पाचोरा येथील ५५ वर्षे वयाचा मच्छिमार बहुळा प्रकल्पात मासेमारी करण्यासाठी गेला असता त्यास विषारी सापाने दंश केल्याने जळगाव येथील सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.या घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. वेरुळी येथील राघो शंकर भिल हा आठ रोजी सायंकाळी सहा वाजेचे दरम्यान बहूळा प्रकल्पात मासे पकडण्यासाठी गेला होता. या दरम्यान त्यास विषारी साप चावल्याने पाचोरा येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून जळगाव येथे हलविण्यात आले, तथापि जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना ९ सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजता त्याचा मृत्यू झाला. त्याच्यावर सोमवारी वेरुळी खुर्द येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. मयताच्या पश्चात पत्नी, दोन मुले, तीन मुली, दोन भाऊ आणि वृद्ध आई वडील असा परिवार आहे. ते माजी ग्रामपंचायत सदस्या विमलबाई भिल यांचे पती होत. या घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पोलिस निरीक्षक अनिल शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली हवालदार हिरामण चौधरी करीत आहेत. 

टॅग्स :snakeसाप