पिलखोड ता. चाळीसगाव : मुलाचा अपघाती मृत्यू झाल्याचा आघात सहन न झाल्याने हृदयविकाराचा झटका येऊन पित्याचा मृत्यू झाल्याची दुर्घटना पिलखोड येथे घडली. या पिता-पुत्राची एकाच वेळी अंत्ययात्रा काढण्याची दुर्दैवी वेळ गावकर्यांवर आली.या हृदयाला चटका लावून जाणार्या घटनेबाबत माहिती अशी की, शनिवारी सायंकाळी ७ वाजेच्या दरम्यान गिरणा पुलावर गोवर्धन किसन बाविस्कर (वय २४) कार-मोटरसायकलच्या अपघातात ठार झाला. त्याचे वडील किसन उर्फ जिभाऊ दौलत बाविस्कर यांना या घटनेची वार्ता कळताच त्यांना हृदयविकाराचा झटका आला व त्याचे २ रोजीच पहाटे ४ वाजता निधन झाले. यामुळे बाविस्कर कुटुंबातच नव्हे तर गावातच शोककळा पसरली. २ रोजी पिता आणि पुत्राची एकाचवेळी अंत्ययात्रा काढण्यात आली. महानुभाव पद्धतीने अंत्यसंस्कार पार पडले. किसन यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी, तीन भाऊ असा परिवार आहे. (वार्ताहर)
पुत्राच्या निधनाच्या धक्क्याने पित्याचाही मृत्यू
By admin | Updated: November 3, 2014 15:22 IST