भुसावळ, जि. जळगाव, दि. 17 - मुक्ताईनगर तालुक्यातील हरताळा येथे खळवाडीला आग लागून कापूस, शेती साहित्य जळून खाक होण्यासह एका बैलाचा होरपळून मृत्यू झाला.सोमवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास खळवाडीला अचानक आग लागली. क्षणार्थात आगीने रौद्र रुप धारण केले. यामध्ये रामदास धनू दांडगे यांच्या मालकीचा बैल दगावला तर सदाशिव शिवराम सपकाळ यांचा कापूस, शेती साहित्य जळून खाक झाले. एक क्षणात होत्याचे नव्हते झाल्याने शेतक:यांवर आभाळ कोसळले.
हरताळा येथे आगीत बैलाचा होरपळून मृत्यू
By admin | Updated: April 17, 2017 15:17 IST