शहरं
Join us  
Trending Stories
1
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
2
आजचे राशीभविष्य- ४ ऑक्टोबर २०२५: पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या, कमी वेळात जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा
3
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
4
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
5
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
6
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
7
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
8
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 
9
अमेरिकेच्या टॅरिफ संकटात भारतासह युरोपियन देशांची भूमिका मोलाची; स्वेन ओस्टबर्ग यांचे मत
10
संपादकीय : आता खरी लढाई! मेळावे झाले, घोषणा झाल्या... आता सीमोल्लंघन कधी?
11
पाणंद रस्ते मोकळे करा,  तरच मिळेल सरकारी लाभ; प्रस्ताव विचाराधीन
12
सोमवारपासून परतीच्या सरी; चक्रीवादळ 'शक्ती'मुळे महाराष्ट्रात पुन्हा पाऊस? हवामान खात्याचा नेमका अंदाज काय?
13
डोनाल्ड ट्रम्प आता सिनेमावाल्यांवर का भडकले?
14
मनोज जरांगेंचा १९९४ च्या जी. आर. विरोधात एल्गार! 'या' दोन मोठ्या जातींच्या आरक्षणावर बोलले
15
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
16
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
17
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
18
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
19
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
20
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश

आईची शस्त्रक्रिया न झाल्याने मुलीची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:45 IST

जळगाव : मुंबई येथे उपचारासाठी गेलेल्या आईवर शस्त्रक्रिया होऊ न शकल्याने वडील आईला घेऊन माघारी फिरल्याच्या नैराश्यातून कोमल सुनील ...

जळगाव : मुंबई येथे उपचारासाठी गेलेल्या आईवर शस्त्रक्रिया होऊ न शकल्याने वडील आईला घेऊन माघारी फिरल्याच्या नैराश्यातून कोमल सुनील भालेराव (१९) या तरुणीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी रात्री तळेले कॉलनीत घडली. दरम्यान, शुक्रवारी सकाळी शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह मूळ गावी मुक्ताईनगर तालुक्यात नेण्यात आला. याप्रकरणी शनी पेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तळेले कॉलनीत भाड्याच्या खोलीत राहणारे सुनील गोरख भालेराव यांची पत्नी सुनंदा यांना कानाचा आजार होता, त्यावर उपचार व शस्त्रक्रिया करण्यासाठी दाम्पत्य मुंबईला गेले होते. घरी मुलगी कोमल व भाऊ शुभम असे दोघेच होते. आईची शस्त्रक्रिया होऊ शकली नाही असे तिला तिच्या वडिलांनी सायंकाळी फोन करुन कळविले. कोमल ही याच गोष्टीमुळे नैराश्यात आली व घरात वरच्या मजल्यावर साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. तेव्हा भाऊ शुभम हा जीमला गेला होता. तेथून रात्री ८ वाजता परत आला असता दरवाजा आतून बंद होता. आवाज देऊनही कोमल प्रतिसाद देत नसल्याने शुभम याने खिडकीतून डोकावून पाहिले असता तिने साडीने गळफास घेतल्याचे दिसले. घाबरलेल्या अवस्थेत त्याने घरमालक किरण यादव तळेले यांना हा प्रकार सांगितला. यादव यांनी शनी पेठ पोलीस ठाणे गाठून घटनेची माहिती दिली. पोलीस निरीक्षक विठ्ठल ससे, हवालदार प्रमोद पाटील व सहकाऱ्यांनी घटनास्थळ गाठले व दरवाजात तोडून कोमल हिला शासकीय रुग्णालयात हलविले. तेथे डॉक्टरांनी मृत घोषित केले.

घरझडतीत संशयास्पद काहीच नाही

या घटनेनंतर पोलिसांनी घरझडती घेतली. मोबाईल किंवा सुसाईट नोट यापैकी काहीच मिळाले नाही. अधिकच्या चौकशीत आईची शस्त्रक्रिया न झाल्याच्या नैराश्यात तिने आत्महत्या केली असावी अशी शक्यता पोलीस निरीक्षक विठ्ठल ससे यांनी ‘लोकमत’जवळ व्यक्त केली. कोमल ही पदवीच्या शेवटच्या वर्षाला होती. वडील सुनील भालेराव हे ट्रकचालक असून पत्नी सुनंदा गृहिणी आहे. शुभम (वय १७) हा आयटीआयला आहे.