शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात 200 मोबाईलची दररोज विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 00:07 IST

ऑनलाईन खरेदीही जोरात : सवलती तसेच नवीन सुविधांचा घेतला जातोय लाभ

ठळक मुद्देऑनलाईन खरेदीलाही पसंतीमोबाईलमध्ये वाढत्या ‘फिचर्स’चा लाभ  खरेदीसाठी गर्दी

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 24 - नवरात्रोत्सवात वाहन व इतर वस्तूंच्या खरेदीसह मोबाईल खरेदीकडेही कल वाढला असून यासाठी दुकानांमध्ये गर्दी होत आहे. कंपन्यांकडून विविध सवलती दिल्या जात असल्याने तसेच नवनवीन सुविधा (फिचर्स) येत असल्याने तरुणाईदेखील याचा जास्तीत जास्त फायदा घेताना दिसत आहे. नवरात्रोत्सव सुरू झाल्यापासून शहरात दररोज  200 ते 250 मोबाईलची  विक्री होत आहे.   नवरात्रोत्सवाच्या पवित्र पर्वात नवीन वस्तू खरेदीवर ग्राहकांचा भर असतो. त्यामुळे विविध वस्तूंच्या खरेदीसाठी गर्दी वाढत असल्याने बाजारपेठेत चैतन्य आहे.  आता दुचाकी, चारचाकी वाहने, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू यांच्यासह मोबाईललादेखील मोठी पसंती वाढली आहे.  नवरात्रोत्सव सुरू झाल्यानंतर पहिल्या दिवसापासूनच मोबाईलला मोठी मागणी वाढली आहे. पहिल्या दिवशी तर 200 मोबाईलची विक्री झाली. अद्यापही विक्री जोरात सुरू असून दररोज तेवढय़ाच प्रमाणात  मोबाईल विक्री होत असल्याचे चित्र आहे. विविध सवलतीदेखील दिल्या जात असल्याने मोबाईलच्या विक्रीत भर पडली असल्याचे सांगण्यात येत आहे. 

दिवसेंदिवस मोबाईलमध्ये तंत्रज्ञानामुळे विविध अत्याधुनिक सुविधा (फिचर्स) येत आहेत. यामध्ये पूर्वी असलेल्या केवळ एक ते दोन जीबी रॅम ऐवजी आता 4 जीबी रॅम येण्यासह 64 जीबी इंटरनल मेमरीर्पयत क्षमता वाढविल्याने याचा लाभ घेण्याकडे कल दिसून येत आहे. विशेष म्हणजे सध्या सेल्फीचा जास्त ट्रेंड असल्याने कॅमेराचे पिक्सल वाढविण्यात आले आहे. 24 मेगा पिक्सल कॅमेरा, बॅटरीची वाढीव क्षमता, मोठा डिस्प्ले, फिंगर स्कॅनर याला अधिक पसंती दिली जात असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. 

ऑनलाईनवरदेखील  मोबाईल खरेदीसाठी मोठय़ा प्रमाणात सवलत दिली जात असल्याने त्याद्वारेही मोबाईल खरेदीला पसंती असल्याचे चित्र आहे.  

नवरात्रोत्सवामुळे मोबाईल खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी  वाढली आहे. कंपन्यांकडून विविध सुविधा दिल्या जात असल्याने तसेच नवनवीन फिचर्समुळेही यात भर पडत आहे. दसरा-दिवाळीर्पयत गर्दी कायम राहू शकते.      - नीलेश पाटील, श्री इलेक्ट्रॉनिक्स.