शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

नियोजन समितीच्या निधीला दोन वर्षांपासून लागतेय कात्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2018 23:13 IST

वाढीव निधी मिळण्याची गरज

ठळक मुद्दे मिळणारा निधी समस्यांच्या १० टक्केही नाहीरस्त्यांचा निधी गेला पाण्यात

जळगाव: राज्यातील अन्य काही जिल्हा नियोजन समित्यांना १५ ते २० टक्के वाढीव निधी दरवर्षी मिळत असताना जळगाव जिल्ह्याच्या नियोजन समितीच्या निधी मात्र गेल्या दोन वर्षांपासून कपातच होत असल्याचे दिसून येत आहे. आधीच उपलब्ध होणारा एकूण निधी हा जिल्ह्यातील समस्या सोडविण्यासाठी आवश्यक निधीच्या १० टक्के देखील नसताना त्यास कात्री लावली जात असल्याने नाराजी व्यक्त होत आहे. दरम्यान सोमवारी तब्बल ९ महिन्यांच्या कालावधीनंतर डीपीसीची बैठक होत असल्याने सदस्य संतप्त असले तरी देखील ही बैठकही घाईगर्दीतच उरकली जाण्याची शक्यता आहे.रस्त्यांचा निधी गेला पाण्यातगेल्या सहा वर्षात जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जिल्ह्यातील ग्रामीण रस्त्यांच्या कामासाठी व दुरुस्तीसाठी तब्बल ३५१ कोटी रूपये खर्च झाले असले तरीही जिल्ह्यातील ग्रामीण रस्त्यांची अवस्था बिकट आहे. कामाचा दर्जा राखला जात नसल्याने तसेच बैलगाडी, ट्रॅक्टरसारख्या वाहनांचा सातत्याने वापर असल्याने या रस्त्यांचे काही महिन्यांमध्येच तीनतेरा होत असल्याने परिस्थिती जैसे-थेच दिसून येत आहे. याउलट मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत रस्त्यांच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी ही मक्तेदारावरच असल्याने या रस्त्यांची अवस्था ५ वर्ष चांगलीच राहणार आहे. त्यामुळेच नियोजनकडील रस्त्यांचा निधी शासनाने मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेकडे वळविला आहे. मात्र त्यापूर्वी गेल्या ६ वर्षात रस्त्यांवर खर्च झालेला ३५१ कोटींचा निधी मात्र पाण्यात गेला आहे. आधीच ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी हजारो कोटींच्या निधीची गरज असताना तुलनेत कमी निधी मिळतो. अशा परिस्थिती नियोजनच्या माध्यमातून खर्च झालेल्या निधीतील रस्त्यांची कामे ही जेमतेम वर्षभरही टिकू न शकल्याने आज या रस्त्यांची चाळणी झालेली दिसून येत आहे. पालकमंत्र्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत जिल्हा व राज्य तसेच राष्टÑीय महामार्गावर खड्डेमुक्त अभियान राबविले. त्यात काही प्रमाणात खड्डे कमी करण्यात यशही आले. तशीच मोहीम ग्रामीण रस्त्यांसाठी देखील राबविण्याची घोषणा करूनही त्याची अंमलबजावणी झालेली नाही. ती मोहीम देखील राबविण्याची गरज आहे.निधीला लागतेय कात्रीजिल्हा नियोजन समितीचे वार्षिक अंदाजपत्रक हे २०१६-१७ मध्ये ४५७ कोटी मंजूर असताना दोन वर्षात मात्र शासनाने या निधीला कात्री लावली आहे. २०१८-१९ साठी ४५१ कोटींचा नियतव्यय मंज़ूर केला आहे. वास्तविक जिल्ह्यासाठी खरी गरज १०८२ कोटींची असताना हा ४५१ कोटींचा निधी अत्यंत तोकडा आहे.शहरी भागावर अन्यायजिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून शहरी व ग्रामीण दोन्ही भागांवर लोकसंख्येच्या तुलनेत निधी खर्च करणे अपेक्षित असताना तसे होताना दिसत नाही. नागरी भागाला अत्यल्प निधी दिला जातो. तर ग्रामीणभागासाठी उपलब्ध करून दिला जाणारा निधी हा तेथील समस्यांच्या तुलनेत अत्यल्प असल्याने सगळ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचेच काम सुरू आहे.नाविन्यपूर्ण योजनेत हायमास्ट अन् संरक्षक भिंतीजिल्हा नियोजन समितीला निधी खर्च करण्यासाठी शासनानेच वेगवेगळे हेड ठरवून दिलेले असल्याने ठरलेल्या हेडखालील निधी त्याच कामांसाठी खर्च करावा लागतो. अन्य कामाला तो वापरता येत नाही. त्यामुळे समितीचे अधिकार मर्यादित झालेले आहेत. त्यातच नाविन्य पूर्ण योजना हे एक लेखाशिर्ष शासनाने उपलब्ध करून दिले आहे. त्यातून नवीन, नाविन्यपूर्ण योजनांसाठी निधी देता येऊ शकतो. मात्र जिल्ह्यात हा निधी प्रामुख्याने हायमास्ट बसविणे, संरक्षक भिंती बांधणे यासारख्या कामांवरच खर्च केला जात असल्याचे चित्र दिसून येत आहे.