शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

महत्त्वाच्या लढतींबाबत उत्सुकता

By admin | Updated: February 23, 2017 01:20 IST

आज स्पष्ट होणार : गुलाबराव पाटील, डॉ. सतीश पाटील, मोरेंची प्रतिष्ठा पणाला

जळगाव : जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राज्यमंत्री गुलाबराव पाटील, आमदार डॉ.सतीश पाटील, माजी खासदार अ‍ॅड.वसंतराव मोरे यांचे पुत्र, माजी आमदार राजीव देशमुख यांचे बंधू आदींसह अनेक दिग्गज नेत्यांचे नातेवाईक नशीब आजमावत आहेत. त्यांच्या भाग्याचा फैसला २३ रोजी मतमोजणीनंतर होईल. दिग्गजांचे नातेवाईक जि.प.च्या आखाड्यात असल्याने त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. यंदाच्या जि.प. निवडणुकीत दिग्गजांचे नातेवाईक रिंगणात असल्याने तेवढीच चुरस निर्माण झाली. जिल्हाभरात याबाबत चर्चा सुरू होती. राजकीय वर्तुळातील जाणकार मागील आठवडाभर वेगवेगळे अंदाज व्यक्त करीत होते. यामुळे दिग्गज नेते आपल्या नातेवाईकांना निवडून आणण्यात यशस्वी होतील की नाही, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. ही उत्सुकता २३ रोजी मतमोजणीनंतर शमणार आहे. १) देवगाव-तामसवाडी  : आमदार डॉ.सतीश पाटील यांचे पुत्र रोहन पाटील व माजी आमदार चिमणराव पाटील यांचा पुतण्या समीर वसंत पाटील.२) लोहटार-खडकदेवळा : माजी आमदार दिलीप वाघ यांची भावजई ज्योती संजय वाघ व जि.प.चे माजी उपाध्यक्ष प्रकाश सोमवंशी यांची स्नुषा वृंदावली सोमवंशी.३) पाळधी -बांभोरी : सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांचे पुत्र प्रताप पाटील व जि.प. सदस्या छाया पाटील यांचे पती रमेश पाटील४) निंभोरा-तांदलवाडी : जिल्हा बँकेचे संचालक नंदकिशोर महाजन व प्रगतिशील शेतकरी भास्कर विठ्ठल पाटील. ५) कानळदा-भोकर :  जि.प.चे माजी अध्यक्ष भिलाभाऊ सोनवणे यांचे बंधू प्रभाकर सोनवणे व बाजार समितीचे संचालक लक्ष्मण पाटील (लकी टेलर). ६) म्हसावद-बोरनार : जि.प.चे माजी अध्यक्ष भिलाभाऊ सोनवणे यांची पत्नी तथा जि.प.च्या माजी सभापती लीलाबाई सोनवणे व भिलाभाऊ सोनवणे यांचे पुत्र पवन सोनवणे. ७ ) सोनवद-पिंप्री खुर्द : जि.प.चे माजी सभापती पी.सी.पाटील यांची पत्नी वैशाली पाटील व जिनिंग व्यावसायिक गोपाळ चौधरी. ८) कुºहे-वराडसिम : आमदार संजय सावकारे यांची वहिनी पल्लवी सावकारे व संगीता सपकाळे. ९) किनगाव-डांभुर्णी : जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष आर.जी.पाटील यांची पत्नी अरूणा पाटील व अन्न व औषध प्रशासन विभागाचे माजी आयुक्त विजय पाटील यांची पत्नी शैलजा पाटील. १०) मंगरूळ-शिरसमणी : माजी खासदार अ‍ॅड.वसंतराव मोरे यांचे पुत्र पराग मोरे व डॉ.हर्षल माने. ११) कासोदा-आडगाव : जि.प.चे माजी उपाध्यक्ष मच्ंिछंद्र पाटील यांची पत्नी उज्ज्वला पाटील व माजी उपाध्यक्ष हिंमतराव पाटील यांची पत्नी सुनंदा पाटील. १२) फत्तेपूर-तोंडापूर : जि.प.तील निवृत्त अभियंता जे.के.चव्हाण यांची पत्नी रजनी चव्हाण व जिल्हा बँकेचे माजी संचालक डी.के.पाटील यांची पत्नी विजया पाटील.१३) देवळी-तळेगाव : माजी आमदार राजीव देशमुख यांचे धाकटे बंधू अतुल देशमुख व भाजपाचे किशोर भिकनराव पाटील. १४) कळमसरे-जळोद : भाजपातून राष्टÑवादीत प्रवेश केलेले अनिल भाईदास पाटील यांच्या पत्नी जयश्री पाटील व काँग्रेसच्या सिंधूबाई प्रताप पाटील. १५) साळवा-बांभोरी खुर्द : माजी जि.प.अध्यक्ष जानकीराम पाटील यांची पत्नी संगीता पाटील व भुसावळचे नगरसेवक चंद्रशेखर अत्तरदे यांच्या पत्नी माधुरी अत्तरदे.