शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण पोहोचले ९४ टक्क्यांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 22:47 IST

प्रयत्नांना यश : सक्रीय रुग्ण संख्या निम्म्यावर जळगाव : जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या ११ हजार ८१३ वरुन ५ ...

प्रयत्नांना यश : सक्रीय रुग्ण संख्या निम्म्यावर

जळगाव : जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या ११ हजार ८१३ वरुन ५ हजार ९१५ पर्यंत म्हणजेच निम्म्याने घटली आहे. त्याचबरोबर गेल्या काही दिवसांपासून बाधित रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण हे सतत वाढते आहे. ही जिल्ह्यासाठी अतिशय दिलासादायक बाब असली तरी नागरीकांनी गाफील न राहता यापुढेही कोरोनाच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले आहे. 

जिल्ह्यात पहिल्या लाटेत सक्रीय रुग्णांची संख्या १२ हजारांच्या आसपास गेली होती. मात्र  कडक निर्बध,  केलेल्या विविध उपाययोजना, माझे कुटुंब, माझी जबाबदारी अभियान व संशयित रुग्ण शोध माहिम  यामुळे जिल्ह्यात कोरोनाची पहिली लाट थोपविण्यात प्रशासनाला यश आले होते. पहिल्या लाटेत जिल्ह्यातील सक्रीय रुग्णांची संख्या १२ हजारांवरुन ३०४ पर्यंत (६ फेब्रुवारी २०२१रोजी)  खाली आणण्यात यंत्रणेला यश आले होते. मात्र फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट येण्यास सुरुवात झाली होती. या लाटेत जिल्ह्यात दररोज हजारो बाधित रुग्ण आढळून येत होते. १ एप्रिल, रोजी जिल्ह्यातील बाधित रुग्ण संख्या ११ हजार ८१३ या उच्चांकी पातळीवर पोहोचली होती. मात्र  ब्रेक द चेन अतंर्गत जिल्ह्यातील कोरोनाचे निर्बध अधिक कडक करण्यात आले. शिवाय बाधित आढळणाऱ्या रुग्णांच्या संपर्कातील तसेच संशयित रुग्णांचा शोध घेऊन कोरोनाची लक्षणे दिसून येणाऱ्या व्यक्तींचे स्वॅब घेऊन कोरोना चाचण्या करण्यात आल्या. त्यामुळे बाधित रुग्णांचा लवकर शोध लागून  वेळेत उपचार झाल्याने रुग्ण बरे होण्याचे प्रमाण तर वाढलेच शिवाय मृत्यूदर रोखण्यातही आरोग्य यंत्रणेला यश आले. सध्या जिल्ह्यात ५ हजार ९१५  सक्रीय रुग्ण आहेत.

४ हजारावर रुग्ण होम क्वारंटाईनजिल्ह्यात आतापर्यंत ११ लाख ५० हजार ७८३ संशयितांचे स्वॅब तपासणीसाठी कोरोना विषाणू प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून त्यापैकी १ लाख ३९ हजार ८२७ अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत तर १० लाख ७ हजार ९२५ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात सध्या ४ हजार ७२२ रुग्ण होम क्वारंटाईन असून २१२ रुग्ण विलगीकरण कक्षात आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या ५ हजार ९१५ सक्रीय रुग्णांपैकी ४ हजार ९०४ रुग्ण लक्षणे नसलेले तर १ हजार ९ रुग्ण हे लक्षणे असलेले आहेत, अशी माहिती  जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी दिली आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव