शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

सोन्यावरील कराचा थेट ग्राहकांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2017 00:20 IST

दोन लाख रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या रोख दागिने खरेदीवर एक टक्का टीसीएस

जळगाव : दोन लाख रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या रोख दागिने खरेदीवर एक टक्का टीसीएस (टॅक्स कलेक्टेड अ‍ॅट सोर्स) लावण्याच्या निर्णयाने याचा थेट फटका ग्राहकांना बसणार असून व्यवसासावरदेखील परिणाम होणार असल्याचा सूर सराफ व्यावसायिकांमधून उमटत आहे. १ एप्रिलपासून अंमलबजावणी होणाऱ्या कराची मर्यादा सध्या ५ लाख रुपये आहे. आर्थिक  विधेयक २०१७ मंजूर झाल्यानंतर दागिनेही सामान्य वस्तूंच्या यादीत येणार  असल्याने यावर एक टक्का कर द्यावा लागणार आहे. त्यामुळे टीसीएससाठी ५ लाख रुपयांच्या मर्यादा घटवून ती दोन लाख रुपये करण्यात आली आहे.कॅशलेस वाढीचा उद्देशसरकारने हा निर्णय घेण्यामागे रोख व्यवहाराऐवजी कॅशलेस व्यवहार वाढीचा व त्या सर्व व्यवहारांची नोंद होऊ शकेल हा उद्देश असल्याचेही सांगितले जात आहे. व्यवसायावर होणार परिणामग्राहकांना या कराची झळ बसत असेल तर साहजिक ग्राहक सोने खरेदी टाळेल. यामुळे व्यवसायावरही परिणाम होऊ शकतो. अनेक जण हौस म्हणून सोने खरेदी करीत असतात. आता याला आळा बसून गरज असेल तरच सोने खरेदी होण्याची अधिक शक्यता आहे. ग्राहकांनाच झळदोन लाखाच्यावर सोने खरेदी करायची झाल्यास द्याव्या लागणाऱ्या कराची झळ थेट ग्राहकांनाच बसणार आहे. कारण १०० ग्रॅम (१० तोळे) जरी सोने घ्यायचे झाल्यास ते तीन लाखांचे होते. अनेक जण लग्न समारंभासाठी १० तोळ्याच्या वरच सोने खरेदी करीत असतात. त्यामुळे हा कर द्यावा लागणार असल्याने ग्राहकांना आता मूल्यवर्धित करासह (व्हॅट) हा करही सहन करावा लागणार आहे. अशाही पळवाटादोन लाखांवर कर आकारला जाणार असेल तर तीन अथवा चार लाखापर्यंत सोने खरेदी करायचे झाले तरी ते पती-पत्नी अथवा कोणत्याही दोन जणांच्या नावाने बिल घेऊन खरेदी करीत कर चुकविला जाऊ शकतो. त्यामुळे यातूनही पळवाटा निघण्याची शक्यता आहे. टीसीएस आकारल्याने त्याचा ग्राहकांवर बोजा पडणार आहे. आधी ही मर्यादा पाच लाखाची होती. ती घटविल्याने ग्राहकांना अधिक झळ सोसावी लागेल. - गौतमचंद लुणिया, जळगाव जिल्हाध्यक्ष, सराफ असोसिएशनटीसीएसमुळे ग्राहकांना तर झळ पोहचेलच शिवाय व्यवसायावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. - स्वरुप लुंकड, सचिव, सराफ असोसिएशन.