शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

‘वीकेंड’ बंदच्या पार्श्वभूमीवर खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:12 IST

जळगाव : डेल्टा प्लस विषाणूच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या निर्बंधामध्ये शनिवार, रविवार अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने बंद राहणार ...

जळगाव : डेल्टा प्लस विषाणूच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या निर्बंधामध्ये शनिवार, रविवार अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने बंद राहणार असल्याने शुक्रवारी विविध साहित्याच्या खरेदीसाठी बाजारपेठेत मोठी गर्दी झाली होती. या दोन दिवस अत्यावश्यक वगळता इतर व्यवसायांना परवानगी नसल्याने शालेय उपयोगी, इलेक्ट्राॅनिक्स, इलेक्ट्रीकल, बांधकाम, रंगकाम इत्यादी साहित्याची जादा खरेदी करून ठेवण्यात आली. विशेष म्हणजे अत्यावश्यक सेवा असणारे व्यवसाय शनिवार, रविवार सुरू राहणार असले तरी त्या साहित्याच्याही खरेदीसाठी ग्राहक बाजारपेठेकडे वळल्याने गर्दीत भर पडली.

जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग कमी झाला असला तरी जिल्ह्यात डेल्टा प्लसचे रुग्ण आढळून आल्यानंतर जळगाव जिल्हा पहिल्या टप्प्यातून थेट तिसऱ्या टप्प्यात गेला व पुन्हा निर्बंध लागू करण्यात आले. यामध्ये सोमवार ते शुक्रवार अत्यावश्यक सेवेसह इतर सर्वच व्यवसाय दुपारी चार वाजेपर्यंतच सुरू ठे‌वण्याची परवानगी देण्यात आली. तसेच शनिवार, रविवार अत्यावश्यक सेवा वगळता इतर व्यवसायांना परवानगी नाकारण्यात आली. या आदेशानंतर वीकेंडला येणारा शनिवार ३ जुलै रोजी पहिलाच वार येत असल्याने या दिवशी अत्यावश्यक सेवा वगळता इतर सेवा बंद राहणार आहे. त्यामुळे शुक्रवार, २ जुलै रोजी खरेदीसाठी मोठी गर्दी दिसून आली.

विविध साहित्याची खरेदी

सध्या बांधकाम व्यवसायाला परवानगी आहे. मात्र शनिवार, रविवार बांधकाम साहित्याची दुकाने बंद राहत असल्याने शुक्रवारी हे साहित्य खरेदीसाठी लगबग दिसून आली. या सोबतच हार्डवेअर दुकानांवरदेखील चांगलीच ग्राहकी होती. वीकेंडला शहरातील मोठे संकुल असलेले महात्मा फुले मार्केट, गोलाणी मार्केट व इतरही संकुल बंद राहणार असल्याने फुले मार्केटमध्ये कापड खरेदी, गोलाणी मार्केटमध्ये मोबाइल व दुरुस्तीसाठी लगबग होती. चित्रा चौकात तर इलेक्ट्रीकल साहित्याच्या खरेदीसाठी देखील ग्राहकी वाढली. या परिसरातून जिल्हाभरात इलेक्ट्रीकल साहित्य पोहोचते. त्यामुळे जिल्हाभरातील खरेदीदार येथे आले होते.

या सोबतच प्रत्यक्षात शाळा सुरू नसल्या तरी ऑनलाईन वर्ग सुरू झाल्याने वह्या, पुस्तके, गाईड, पेन व इतरही साहित्याची मुलांकडून मागणी होत असल्याने पालकवर्ग हे साहित्य अगोदरच खरेदी करून ठेवत आहे.

किराणा साहित्याच्या ग्राहकांची भर

शनिवार, रविवार अत्यावश्यक सेवेतील दुकाने सुरू राहणार असली तरी सुट्टीच्या दिवशी गावात जाणे टाळता यावे म्हणून अनेकांनी शुक्रवारीच किराणा साहित्याच्या खरेदीसाठीदेखील गर्दी केली होती. त्यामुळे बाजारपेठेतील गर्दीत अधिकच भर पडली.