शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

पारोळ्यात भरवस्तीत घरफोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2019 18:51 IST

नगराध्यक्ष यांच्या स्विय सहाय्यकाचे घर झाले लक्ष

पारोळा -शहरात भरवस्तीत गुरव गल्लीतील रहिवासी व नगराध्यक्ष यांचे स्विय सहाय्यक कैलास नाना पाटील यांच्या घराचा दरवाजा उघडून ५० हजार रुपयांची चोरी अज्ञात चोरट्यांनी ३ रोजी पहाटे केली. चोरीचे सत्र थांबता थांबत नसल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. याचबरोबर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित होत आहे. चोरीच्या वेळी गुंगीचा स्प्रे वापरला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात आला.कैलास पाटील यांचे घर भरवस्तीत आहे. रात्रभर या रस्त्यावर वर्दळ चालू असते. तरी चोरट्यांनी धाडस करून घरफोडी करणे म्हणजे पोलिसांचा रात्रीच्या गस्तीला हे एक आव्हानच म्हणावे लागेल. ३ रोजी पहाटे कैलास पाटील कुटुंबासह घरात झोपले असतांना. चोरट्यांनी दरवाजा उघडून घरात प्रवेश करीत कैलास पाटील यांच्या पॅन्टच्या खिशातून रोख १३हजार रुपये व त्यांचा २७ हजारांचा मोबाईल तसेच त्यांच्या पत्नीचा १२ हजाराचा मोबाईल , घडयाळ ५ हजार रुपये किंमतीची तसेच किरकोळ ३ हजाराचे साहित्य असा एकूण ५० हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरून नेला. लोखंडी कपाटातील साहित्य अस्ताव्यस्त करीत कपाटात पैसे व दागिन्यांची शोधाशोध केली.कैलास पाटील हे घरातील पाहिल्याच रुममध्ये झोपले होते त्यांना ओलांडून हे चोरटे घरातील दुसऱ्या रुममध्ये गेले. तरीही त्यांना जाग आली नाही. याप्रकरणी पोरोळा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.दरम्यान सध्या एक रात्र अशी जात नाही की शहरात चोरी झाली नाही. शहराला लागलेले चोरीचे हे ग्रहण केव्हा सुटणार असा प्रश्न नागरिकांकडुन उपस्थित केला जात आहे. एका बाजूला दोन डझनभर पोलीस रात्रीच्या गस्त साठी लावण्यात आल्याचे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात येत असले तरी घरफोडया होतच आहेत. पोलीस निरीक्षक लीलाधर कानडे यांचा पाहिजे तसा वचक अजूनही निर्माण झाला नाही. या आधी या पोलीस ठाण्यात दिवंगत पोलिस निरीक्षक वाय. डी. पाटील, हिंमतराव देसाई, गणेश मोरे यांच्या नावात दरारा होता. मात्र अलीकडे महिनाभरात धाडसी घरफोडीसह अनेक दुकानात पत्रा कापून चोरी झाली. पण एकाही चोरीचा तपास लागला नाही.