शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

उद्धरली कोटी कुळे, भीमा तुङया जन्मामुळे.!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2017 00:16 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 126व्या जयंतीचा सर्वत्र उत्साह : ठिकठिकाणी अभिवादन, दुचाकी रॅली, व्याख्यान, मिरवणुका

जळगाव : भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतर}, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 126 व्या जयंतीनिमित्त त्यांना शुक्रवारी विनम्र अभिवादन करण्यात आले. जयंतीनिमित्त ठिकठिकाणी सवाद्य मिरवणुका, दुचाकी रॅली, व्याख्याने, भीमगीत गायनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. अनेक ठिकाणी सायंकाळी काढण्यात आलेल्या मिरवणुका रात्री उशिरार्पयत सुरू होत्या. अबालवृद्धांनी मिरवणुकांमध्ये उत्साहाने सहभाग घेतला.जामनेर जामनेर येथे भारतीय बौद्ध महासभा व समता सैनिक दल शाखा भीमनगर  यांच्यातर्फे  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 126 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. नगराध्यक्षा साधना महाजन, गटनेते महेंद्र बाविस्कर यांच्यासह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने  मानवंदना दिली. या वेळी  नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते. दरम्यान  डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक शहरातून काढण्यात आली. भीमनगर येथे नगराध्यक्षा साधना महाजन , महेंद्र बाविस्कर, अनिल बोहरा, मुकुंदा सुरवाडे, छगन झाल्टे,  पहाडू सुरवाडे, वसंत सुरवाडे, राहुल इंगळे, माधव चव्हाण, सितेश साठे, चंद्रमणी पानपाटील, संतोष सुरवाडे, पोलीस निरीक्षक नजीर शेख, विशाल पाटील, रहीम शेख, किशोर झांबरे, समाधान वाघ, प्रा. शरद पाटील, रमेश सुरवाडे, योगेश देशपांडे, डॉ. नंदलाल पाटील, आत्माराम शिवदे, अरुण जाधव यांच्यासह अनेक पदाधिका:यांनी मानवंदना दिली. त्यानंतर भीमनगर येथून भव्य मिरवणूक काढण्यात आली. दरम्यान,  नगरपालिका, पोलीस स्टेशन, पंचायत समिती, तहसील कार्यालय व विविध शासकीय कार्यालयांत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.एरंडोल  एरंडोल येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यास उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. या वेळी तहसीलदार सुनीता ज:हाड, नगराध्यक्ष रमेश परदेशी, उपनगराध्यक्ष जहिरोद्दीन शे. कासम, मुख्याधिकारी विशाखा मोटघरे, पो. नि. बाळासाहेब केदारे, अॅड.किशोर काळकर, माजी नगराध्यक्ष देवीदास महाजन व रवींद्र महाजन, भुसावळचे माजी नगराध्यक्ष अनिल चौधरी, मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष नरेंद्र पाटील, अमित पाटील, शालिग्राम गायकवाड, डॉ. वसंतराव झाडखंडे, जि.प. सदस्य नानाभाऊ महाजन, नगरसेवक, नगरसेविका, विविध क्षेत्रातील मान्यवर व नागरिक उपस्थित होते.  या वेळी अनिल चौधरी संचलित पाणपोईचे उद्घाटन शालिग्राम गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. प्रवीण केदार यांनी सूत्रसंचालन तर प्रास्ताविक रणजित मोरे यांनी केले. भैया अहिरे यांनी आभार प्रदर्शन केले.दरम्यान, सकाळी भीमसैनिकांतर्फे शहरातून मोटारसायकल रॅली काढण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी पंचशील मित्र मंडळ, सम्राट मित्रमंडळ, रमाबाई आंबेडकर मित्रमंडळ आदी संघटनांच्या कार्यकत्र्यानी परिश्रम घेतले.धरणगाव धरणगाव येथील महात्मा फुले हायस्कूल येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सर्वप्रथम पर्यवेक्षक एम. के. महाजन  व  एस. आर. महाजन यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या वेळी मुख्याध्यापक  जे.ए. अहिरे , सौ. पी.आर. सोनवणे , सौ. एम.के. कापडणे,  व्ही.पी. महाले, जे. एस. पवार, एम.बी. मोरे,  एस.व्ही. आढावे ,  एस.एन. कोळी ,  पी. डी. पाटील,  व्ही.टी. माळी, एच.डी. माळी, श्रीमती एम.जे. महाजन, श्रीमती  व्ही.पी. व:हाडे,  जी.ए. रोकडे,  के. आर. मोरे,  आर.जे.अहिरे, जी.पी. महाजन, जे.डी. भोई,  पी.एस. पवार  आदी उपस्थित होते.प.रा.विद्यालय प.रा. विद्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. मुख्याध्यापक सुनील मिसर, उपमुख्याध्यापक बद्रिनाथ पाटील, पर्यवेक्षक भटू चौधरी, डॉ. संजीवकुमार सोनवणे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून वंदन करण्यात आले. या वेळी विद्यार्थीची भाषणे झाली. त्यात अनुष्का सपकाळे, उमेश चौधरी यांनी सहभाग नोंदवला.   तसेच शहरातील बालकवी ठोंबरे व सा.दा. कुडे विद्यालयात  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. मुख्याध्यापक जीवन पाटील, मुख्याध्यापक एस.एस. पाटील यांनी प्रतिमा पूजन  केले. सूत्रसंचालन के.के.चव्हाण यांनी केले.धरणगाव नगरपालिका धरणगाव नगरपालिकेतर्फे सकाळी 8.30 वाजता नगराध्यक्ष सलीम पटेल यांच्या हस्ते  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.  या वेळी शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ , उपनगराध्यक्षा सुरेखा विजय महाजन, मुख्य लिपिक राजेंद्र बारड, नगरसेवक भास्कर महाजन, नगरसेविका उज्ज्वला साळुंखे, कल्पना विलास महाजन,  भागवत चौधरी,  अंजली भानुदास विसावे, शिवसेना गटनेते पप्पू भावे, कीर्ती किरण मराठे,  अहमदखा पठाण,  मंदा जितेंद्र धनगर,  वासुदेव चौधरी,  आराधना नंदकिशोर पाटील, माजी नगराध्यक्ष सुरेश चौधरी, शहर प्रमुख राजेंद्र महाजन, अजय चव्हाण, राजेंद्र ठाकरे, धीरेंद्र पुरभे, विलास महाजन, मच्छिंद्र पाटील,  किरण अगिAहोत्री, लक्ष्मण महाजन, राहुल रोकडे, कालू उस्ताद, पप्पू कंखरे, सुनील जावरे, संजय महाजन, रवींद्र कंखरे, जयेश महाजन तसेच भाजपाचे गटनेते कैलास माळी, नगरसेवक ललित येवले,  शरद कंखरे,  दीपक चौधरी, बी.एस.तडवी, प्रवीण देशपांडे,  प्रकाश चौधरी, सुरेश पारेराव, युवराज मराठे, अशोक चव्हाण, अनिल पाटील,  विजय महाजन, गांगुर्डे, संतोष चौधरी आदी  उपस्थित होते.गौतमनगर गौतमनगर भागातील युवकांनी रात्री कॅन्डल मार्च काढून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन केले. सकाळी माजी उपनगराध्यक्ष दीपक वाघमारे, गो.भि.सोनवणे, मिलिंद पवार, गणेश सोनवणे, रवी सोनवणे, प्रा.अजय सपकाळे, सागर गायकवाड, बापू शिरसाठ, कैलास पवार, राजेंद्र गायकवाड, नयना सोनवणे, नवल खंडारे यांच्यासह समाज बांधवांनी डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यास  पुष्पहार अर्पण करून वंदन केले.तालुका काँग्रेस कमिटी धरणगाव तालुका व शहर काँग्रेस कमिटीतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार करण्यात आले. याप्रसंगी प्रदेश सचिव डी.जी. पाटील, प्रा. सम्राट परिहार, महिला तालुका अध्यक्षा चारूशीला पाटील, तालुका अध्यक्ष रतीलाल चौधरी, शहर अध्यक्ष राजेंद्र न्हायदे,  बंटी पवार, किरण मराठे, चंदन पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.बाभूळगाव येथे ज्ञानदिवस  बाभूळगाव ता. धरणगाव येथे  डॉ. आंबेडकर यांची जयंती ज्ञानदिवस म्हणून साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी नीळकंठ पाटील होते.  सरपंच रंजना अहिरे यांनी दीपप्रज्वालन केले. प्रमुख अतिथी म्हणून शिवसेनेचे तालुका प्रमुख गजानन नाना  होते. समाधान  लांबोळे,  आत्माराम भोई , ग्रामसेविका जयश्री पाटील, माजी सरपंच  भालेराव आदी उपस्थित होते. धरणगाव येथे मोटारसायकल रॅलीधरणगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्ताने बौद्ध विहार बालसंस्कार केंद्रातर्फे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून               ‘जय भीम’ च्या गजरात मोटारसायकल रॅली काढण्यात आली. या वेळी सागर गायकवाड यांच्यासह, गौतमनगर व शहरातील भीमसैनिकांनी त्यात मोठय़ा प्रमाणावर सहभाग नोंदविला.