शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

घरफोडीच्या तयारीत असलेल्या गुन्हेगाराला पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2017 21:44 IST

घरफोडीच्या तयारीत असलेल्या गणेश नारायण काळे या अट्टल गुन्हेगारास रात्री गस्तीवर असलेल्या शहर पोलिसांनी इंद्रप्रस्थ नगरात पहाटे तीन वाजता पकडले. त्याला अटक करुन त्याच्याविरुध्द कलम १२२ नुसार कारवाई करण्यात आली आहे. गणेश हा पोलिसांच्या रेकॉर्डवर असलेला अट्टल गुन्हेगार आहे. दरम्यान, पोलिसांना पाहिल्यानंतर पळत असताना चिखलात कोसळल्याने तो पोलिसांच्या हातात लागला.

ठळक मुद्देपोलिसांना पाहून पळतांना चिखलात पडला १२२ नुसार कारवाई इंद्रप्रस्थ नगरात आढळला संशयित

आॅनलाईन लोकमतजळगाव दि,२६ : घरफोडीच्या तयारीत असलेल्या गणेश नारायण काळे या अट्टल गुन्हेगारास रात्री गस्तीवर असलेल्या शहर पोलिसांनी इंद्रप्रस्थ नगरात पहाटे तीन वाजता पकडले. त्याला अटक करुन त्याच्याविरुध्द कलम १२२ नुसार कारवाई करण्यात आली आहे. गणेश हा पोलिसांच्या रेकॉर्डवर असलेला अट्टल गुन्हेगार आहे. दरम्यान, पोलिसांना पाहिल्यानंतर पळत असताना चिखलात कोसळल्याने तो पोलिसांच्या हातात लागला.घरफोडीच्या गुन्ह्यातील बहुतांश गुन्हेगार हे सध्या वेगवेगळ्या पोलीस स्टेशनच्या कोठडीत आहेत तर काही जण कारागृहात आहेत. असे असतानाही शहरात घरफोडी व चोरीच्या घटनांनी डोके वर काढल्याने पोलीस उपअधीक्षक सचिन सांगळे यांनी सर्व गुन्हेगारांची सद्यस्थिती तपासली असता ही माहिती समोर आली. त्यामुळे सांगळे यांनी सर्व पोलीस ठाण्यांच्या गुन्हे पथकाला रात्रीची गस्त वाढविण्याच्या सूचना केल्या. स्वत: सांगळे तसेच परिविक्षाधीन उपअधीक्षक धनंजय पाटील हे सोमवारी रात्री गस्तीवर होते.

इंद्रप्रस्थ नगरात आढळला संशयितशहर पोलीस स्टेशनचे प्रदीप ठाकूर यांच्या पथकातील विजयसिंग पाटील, प्रितम पाटील, गणेश शिरसाळे व मोहसीन बिराजदार आदींचे एक पथक गस्तीवर असताना इंद्रप्रस्थ नगरात गणेश काळे हा संशयास्पदरित्या फिरताना आढळून आला. त्याला आवाज देऊन थांबविण्याचा प्रयत्न केला असता त्याने पळ काढला. पोलिसांनी त्याचा पाठलाग केला असता तो चिखलात कोसळला. त्याच अवस्थेत पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले.