शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

परजिल्ह्यातून येणाऱ्यांवर होणार गुन्हा दाखल - जिल्हाधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2020 22:14 IST

परजिल्ह्यातून येणाऱ्यांची माहिती पोलिसांना द्यावी

जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकाडाऊनच्या काळातही इतर जिल्ह्यातून काही नागरिक जळगाव जिल्ह्यात येवून राहत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे जिल्ह्यातही या विषाणूचा प्रादुर्भाव वाढू शकतो. ही बाब लक्षात घेता नागरिकांनी इतर जिल्ह्यातून कोणाला आपल्या जिल्ह्यात, गावात येवू देवू नये, कोणी नागरिक आपल्या जिल्ह्यात आल्यास त्याची माहिती तातडीने नजीकच्या पोलीस स्टेशनला द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी जिल्ह्यातील नागरिकांना केले आहे. तसेच परजिल्ह्यातून येणाºयांवर गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यात करण्यात येत असलेल्या व करावयाच्या उपाययोजनांसंदर्भात जिल्हास्तरीय समितीची आढावा बैठक गुरुवारी जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली झाली, त्या वेळी ते बोलत होते. याप्रसंगी पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, महानगरपालिका आयुक्त सतीश कुलकर्णी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे, अपर जिल्हाधिकारी डॉ. नंदकुमार बेडसे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप पाटोडे यांच्यासह नोडल अधिकारी उपस्थित होते.परप्रांतीयांना स्थानिक पातळीवर रोजगारडॉ. ढाकणे पुढे म्हणाले की, वाढीव लॉकडाऊनच्या कालावधीत निवारागृहात असलेल्या राज्याच्या इतर जिल्ह्यातील नागरिकांना त्यांच्या मुळगावी जायचे असल्यास तशी व्यवस्था करावी. परप्रांतातील नागरिकांबाबत शासनाच्या सूचना येईपर्यंत त्यांना स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध करुन देण्याचे नियोजन करावे, असेही त्यांनी सूचित केले. जळगाव येथील कोरोना रुग्णालयात सध्या ११८ व्यक्ती दाखल आहेत. येथील परिस्थिती लक्षात घेता कोरानाची लक्षणे नसलेल्या रुग्णांवर तालुक्याच्या ठिकाणीच कोविड केअर सेंटरमध्ये उपचार करण्यात यावे, आवश्यकता भासत असल्यास त्यांना तेथेच अ‍ॅडमिट करुन घ्यावे तसेच ज्या व्यक्तींना सामाजिक क्वारंटाईन करावयाचे आहे, त्यांनाही तालुक्याच्या ठिकाणी ठेवावे, त्यांना कोरोना रुग्णालयात आणू नये, अशा सूचना या वेळी देण्यात आल्या.पोलीस पाटील, ग्रामसेवक, तलाठ्यांवरही होणार कारवाईगेल्या दोन तीन दिवसांपासून जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांनी जिल्ह्यातील तपासणी नाक्यांना भेटी देऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेतला असता बुलढाणा, औरंगाबाद, मालेगाव या हॉटस्पॉटमुळे जिल्ह्याला अधिक धोका आहे. त्यातच धुळे जिल्ह्यात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे अमळनेर, पारोळा, चाळीसगाव या तालुक्यातील नागरिकांना अधिक सजग रहावे. यापुढे इतर जिल्ह्यातून कोणीही नागरिक आपल्या जिल्ह्यात आल्यास तो ज्या मार्गाने आला त्या मार्गावर बंदोबस्तास असलेल्या अधिकाºयांबरोबरच तो ज्या गावात आला त्या गावातील पोलीस पाटील, ग्रामसेवक, तलाठी व इतर शासकीय कर्मचारी यांच्यावरही कारवाई करण्याचा इशारा दिला असून येणाºया व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्याची सूचना पोलीस यंत्रणेला दिल्या आहेत.जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी आपली व कुटुंबाची काळजी घ्यावी, लॉकडाऊनचे पालन करावे, शासनाच्या नियमांचे पालन करावे, कोरोनाची साखळी तोडण्यासाठी मीच माझा रक्षक ही भूमिका प्रत्येक नागरिकाने घ्यावी, कोरोनाचा प्रतिकार करण्यासाठी प्रशासनास नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे आणि पोलीस अधीक्षक डॉ. उगले यांनी केले आहे.धान्यासाठी गर्दी करू नयेस्वस्त धान्य वाटपाच्यावेळी स्वस्त धान्य दुकानाच्या ठिकाणी त्या भागातील शिक्षक, तलाठी, ग्रामसेवक यांनी उपस्थित राहून सोशल डिस्टन्सिंगचे पालन होईल याची दक्षता घ्यावी. शासनाच्या नियमानुसार पात्र सर्व लाभार्थ्यांना धान्याचे वाटप होणार असल्याने नागरिकांनी गर्दी करु नये, असे आवाहनही जिल्हाधिकाºयांनी केले.

टॅग्स :Jalgaonजळगाव