शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

ढाब्यावर पिस्तूल काढल्याप्रकरणी भुसावळच्या माजी उपनगराध्यक्षाविरुद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 04:32 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : ढाब्यावर जेवणाला बसलेले असताना खुर्चीला लाथ मारून ती खुर्ची श्वानाला लागल्याच्या कारणावरून भुसावळचे माजी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : ढाब्यावर जेवणाला बसलेले असताना खुर्चीला लाथ मारून ती खुर्ची श्वानाला लागल्याच्या कारणावरून भुसावळचे माजी नगराध्यक्ष अनिल चौधरी व जळगाव मनपाचे माजी नगरसेवक सुनील माळी यांचे भाऊ मुकेश दत्तात्रय माळी एकमेकांच्या अंगावर धावून जाण्यासह पिस्तूल काढल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. ही घटना रविवारी रात्री पावणेअकरा वाजता महामार्गावर खेडी शिवारातील हॉटेल न्यू पंजाब ढाब्यावर घडली. याप्रकरणी मंगळवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अनिल चौधरी, मुकेश माळी, भगत बालाणी यांच्यासह नऊ जणांविरुद्ध दंगल व शस्रांचा गैरवापर केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ढाब्यावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यात चौधरी व माळी गट एकमेकांवर चालून येत असून, हाणामारी करताना दिसून येत आहेत. खुर्च्यांचीही तोडफोड झाली आहे. आवराआवर झाल्यानंतरही दोन्ही गट एकमेकांवर धावून येतात व परतीच्या वेळी एका जणाजवळ पिस्तूल दिसून येत आहे. घटना घडल्याची खात्री व पुरावे मिळाल्यावर पोलीस कर्मचारी मुकेश पाटील यांनीच सरकारतर्फे फिर्याद दिली. त्यात दंगल व शस्राचा वापर केला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.