शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

आमदार उन्मेष पाटील यांच्यासह ९ जणांविरुध्द गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2019 20:38 IST

न्यायालयाचे आदेश : माजी सैनिकावर प्राणघातक हल्ला प्रकरण

चाळीसगाव - माजी सैनिक सोनू हिम्मत महाजन यांच्यावर तलवारीने प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी आमदार उन्मेष पाटील यांचेसह ९ जणांविरुध्द चाळीसगाव शहर पोलिसात मंगळवारी गुन्हा दाखल झाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने पोलिसांना आदेश दिले होते. त्यानंतर ८ दिवसानंतर हा गुन्हा दाखल झाला.२ जुन २०१६ रोजी सायंकाळी ५ वाजता पोलिसांकडे आमच्या विरोधात तक्रार करतो या कारणावरून माजी सैनिक सोनू महाजन यांना शिवीगाळ व मारहाण केली होती. आमदार उन्मेष पाटील यांनी भावेश कोठावदे याला सोनू महाजन यांना मारण्यासाठी चिथावणी दिल्यानंतर त्याने तलवारीने सोनू महाजन यांच्या डोक्यावर वार करुन गंभीर जखमी केले. तसेच फिर्यादी मनिषा महाजन यांनाही मारहाण करीत त्यांच्या डाव्या व उजव्या खांद्याला भारती कोठावदे यांनी चावा घेतला. त्यानंतर लक्ष्मीबाई कोठावदे हिने मनिषा महाजन यांच्या गळ्यातील १४ ग्रॅम वजनाची ३३ हजार २०० रुपये किंमतीची सोन्याची पोत काढून घेतली. मुकूंद कोठावदे याने सोनू महाजन यांच्या खिश्यातील २७०० रुपये तर बबड्या शेख व भूषण बोरसे याने २५ हजार रुपये किंमतीचे दुचाकी चोरुन नेली होती. याप्रकरणी मनिषा सोनू महाजन यांच्या फिर्यादीवरून मुकूंद भानूदास कोठावदे, भावेश मुकूंद कोठावदे, भारती मुकुंद कोठावदे, पप्पु मुकुंद कोठावदे, लक्ष्मीबाई भानुदास कोठावदे, बबड्या शेख, भुषण उर्फ शुभम बोरसे, जितेंद्र वाघ, आमदार उन्मेष पाटील यांचे विरुध्द भा.दं.वि.कलम ३०७,३९५,३२४,१४३,१४७,१४८,१४९,५०४,५०६ सह आर्म अ‍ॅक्ट ४/२५ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.मनिषा महाजन यांनी औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशानुसार ३० एप्रिल रोजी चाळीसगाव शहर पोलिसात तक्रार दिली होती. पोलिसांनी फिर्यादी व साक्षीदारांचे जाबजबाब घेतले. अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव व पोलीस उपअधीक्षक नजिर शेख यांच्याकडेही दोघांची चौकशी झाली होती. पोलिसांनी या संदर्भात जिल्हा सरकारी वकील यांचे मार्गदर्शन घेतले. त्यानंतर ८ दिवसानंतर हा गुन्हा दाखल झाला. पुढील तपास पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकुरवाड तपास करीत आहे.