शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG 5th Test: Gus Atkinson चा 'पंजा'! टीम इंडियानं २० धावांत गमावल्या ४ विकेट्स! अन्...
2
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
3
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
4
'निराधार आणि बेजबाबदार'; राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने सोडले मौन, काय दिले उत्तर?
5
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर
6
सेबीच्या नियमांना फाटा देऊन शेअर्सची खरेदी-विक्री, पण धोकाही मोठा! 'ग्रे मार्केट'ची Inside Story
7
Shravan Shanivar 2025: शनिवारी कसे करावे अश्वत्थ मारुती पूजन? पिंपळाच्या झाडाचीही पूजा महत्त्वाची!
8
नागरिकांची झोप उडवणाऱ्या चड्डी- बनियान टोळीला पकडण्यात पोलिसांना यश!
9
आशा भोसलेंनी पुण्यातील आलिशान फ्लॅट विकला! एकाच झटक्यात कमावले इतके कोटी, तब्बल ४२ टक्के वाढ
10
कुठल्याही देवावर विश्वास नाही, कुठलाही धर्म मानत नाही, या १० देशांमधील बहुतांश लोक आहेत नास्तिक
11
Viral Video: भल्यामोठ्या अजगराला दुचाकीला बांधून फरफटत नेलं, संतापजनक प्रकार कॅमेऱ्यात रेकॉर्ड!
12
वानखेडे स्टेडियममध्ये सुनील गावसकर, शरद पवार यांचा होणार गौरव, MCA उभारणार पुतळा
13
जुहूच्या समुद्रात दोन अल्पवयीन मुले बुडाली; एकाला वाचवलं, दुसऱ्याचा शोध सुरू!
14
Prajwal Revanna: माजी पंतप्रधान देवेगौडांचा नातू प्रज्ज्वल रेवण्णा अत्याचार प्रकरणात दोषी, उद्या शिक्षेची घोषणा
15
Dahi Handi 2025: गोविंदा आला रे...! सरकार संरक्षण देणार; राज्यातील १.५० लाख गोविंदांचा विमा काढणार...
16
मानहानी प्रकरणात कंगनाला मोठा धक्का; उच्च न्यायालयाने फेटाळली याचिका, नेमकं प्रकरण काय?
17
'हल्ली मुली नग्न होऊन पैसे कमावत आहेत'; साध्वी ऋतंभरा यांच्या विधानाने नवा वाद
18
फक्त ३,००० रुपये भरा आणि वर्षभर टोल फ्री प्रवास करा, १५ ऑगस्टपासून नवा नियम! फक्त 'या' वाहनांना लागू
19
IND vs ENG : एक धाव वाचवण्याच्या नादात 'मॅच विनर' खेळाडू कसोटीतून OUT; टीम इंडिया याचा फायदा उठवणार?
20
कृषिमंत्रिपदाची सर्वात पहिली ऑफर अजित पवारांनी मला दिली होती; छगन भुजबळांचा गौप्यस्फोट

देशाची वाटचाल हुकूमशाहीच्या दिशेने-दिलीप वळसे पाटील यांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 17:23 IST

राष्टÑवादीतर्फे जळगावात हल्लाबोल मोर्चा

ठळक मुद्दे पिस्तुल घेऊन स्टंटबाजी करणाºया मंत्र्यांना बॉर्डरवर पाठवानोटाबंदी अपयशीभाजपातच भांडणे

जळगाव: राज्यातील भाजपाचे सेना युतीचे सरकार सर्वच पातळ्यांवर अपयशी ठरले आहे. राज्यात तर १ लाख ५५ हजार कोटींचे नवे कर्ज केल्याने राज्य कर्जबाजारी झाले आहे. या १ लाख ५५ हजार कोटींच्या कर्जाच्या रक्कमेतून काय केले? ते पैसे कुठे गेले? असा सवाल करीत सर्व पातळ्यांवर नापास भाजपा-सेना युती सरकारला घरी पाठवा, असे आवाहन राष्टÑवादीचे नेते, विधानसभेचे माजी अध्यक्ष व जिल्हा प्रभारी दिलीप वळसे पाटील यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर आयोजित हल्लाबोल आंदोलनाप्रसंगी केले. देशाची वाटचाल हुकूमशाहीच्या दिशेने सुरू असल्याची टीकाही त्यांनी केली.राज्य सरकारच्या अनागोंदी आणि जनविरोधी  कारभाराचा निषेध म्हणून जिल्हा राष्टÑवादीतर्फे मंगळवार दि.२८ रोेजी जिल्हाधिकारी कार्यालयावर हल्लाबोल आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. राष्टÑवादीच्या आकाशवाणी चौकातील कार्यालयापासून या मोर्चाला प्रारंभ झाला. जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ या मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. त्यावेळी मार्गदर्शन करताना सरकारच्या नाकर्तेपणामुळेच हल्लाबोल आंदोलन उगारण्याची वेळ आल्याची टीका वळसे पाटील यांनी केली. याप्रसंगी राष्टÑवादीचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉ.सतीश पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी खासदार ईश्वरलाल जैन, अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष हाजी गफ्फार मलिक, माजी आमदार राजीव देशमुख, दिलीप वाघ, दिलीप सोनवणे, अरूण पाटील, महानगराध्यक्ष निलेश पाटील, महिला  राज्य उपाध्यक्षा विजया पाटील, जिल्हाध्यक्षा कल्पना पाटील, मीनल पाटील, अ‍ॅड.रविंद्र पाटील, जिल्हा बँक संचालक संजय पवार, योगेश देसले,  विलास भाऊलाल पाटील, किसान सभेचे सोपान पाटील, वाल्मिक पाटील, रवि देशमुख, उज्ज्वल पाटील यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.हुकूमशाहीच्या दिशेने वाटचालपंतप्रधान मोदी परदेश दौºयावर बेसुमार खर्च करीत असून उद्योजकांना लाभ देत आहेत. मात्र शेतकºयांच्या तोंडाला पुसली पाने. आज देशाच्यासीमा सुरक्षीत नाहीत, नागरिकही सुरक्षित नाहीत. विकासाचा जाहीरनामा दिला. मात्र आज राममंदिराच्या नावाखाली पुन्हा नागरिकांमध्ये भेद निर्माण करण्याचा डाव असल्याची टीका केली. भाजपा नेते आणीबाणीवर टीका करतात. मात्र आज सरकार विरोधात कुणी बोलायला लागल तर त्याचा आवाज दडपला जातो. एखादे माध्यम बंद करण्याची भूमिका घेतली जाते.गेल्या साडेतीन वर्षात शेतमालाची निर्यात ६४ हजार कोटींनी घटली. तर ६५ हजार कोटींच्या शेतमालाची आयात करण्यात आली. शेतकºयांच्या प्रश्नाकडे दूर्लक्ष का? स्वामीनाथन आयोगाचे काय झाले?गोवंश हत्याबंदी कायदा जुनाच. मात्र मूळ प्रश्नांना बगल देण्यासाठी वादग्रस्त विषयांना फाटे फोडण्याचे काम सुरू असल्याची टीका पंतप्रधान मोदींवर त्यांनी केली.नोटाबंदी अपयशीआरबीआय म्हणते अजून नोटा मोजण्याचेच काम सुरू आहे. तर काळा, पांढरा पैसा किती माहिती नाही. मग जे उद्योग यामुळे बंद झाले. बेरोजगारी वाढली, शेतकरी अडचणीत आले. अतिरेकी कारवाया थांबल्याच नाहीत. काळा पैसा परदेशातून आलाच नाही. त्याला जबाबदार कोण? नोटाबंदीप्रमाणेच विचार न करताच जीएसटी लावला. वेगवेगळे कराचे दर ठेवले. आज सुरतमध्ये व्यापाºयांनी बंद ठेवला. त्यानंतर निवडणुका लक्षात घेऊन दर कमी केले. कडधान्य, भाजीपाल्याचे दर वाढले. आंतरराष्टÑीय बाजारात क्रुड आॅईलचे दर कमी होऊनही पेट्रोल-डिझेलचे दर कमी झाले नाहीत. राज्यात तर राज्य शासनाने ४८ टक्के कर लावला आहे. अखेर केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांनी पुण्याच्या पालकमंत्र्यांना विनंती करून मुख्यमंत्र्यांना सांगून कर कमी करा, म्हणजे पेट्रोल-डिझेल स्वस्त होईल, असे सांगितले. पुण्याच्या पालकमंत्र्यांना विनंती आहे, त्यांनी किमान १० टक्के तरी कर कमी करण्यासाठी प्रयत्न करावा. म्हणजे जनतेला दिलासा मिळेल, अशी मागणी वळसे पाटील यांनी केली.पिस्तुल घेऊन स्टंटबाजी करणाºया मंत्र्यांना बॉर्डरवर पाठवाराष्टÑवादीचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉ.सतीश पाटील म्हणाले की, राज्यात व जिल्ह्यात कापसाला भाव नाही. गुजरातमध्ये मात्र निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कापसाला ५०० रूपये बोनस दिला आहे. महाराष्टÑाची मात्र चिंता नाही. कापसासाठी उपोषण करणारे गिरीश महाजन यांना आता या विषयाकडे लक्ष द्यायला वेळ नाही. हातात बंदूक घेऊन बिबट्या शोधत फिरताय. त्यांना बॉर्डरवर पाठवायला पाहिजे, अशी टीका केली.  बिबट्या पकडण्याचे काम अधिकाºयांचे आहे. स्वत: मंत्री हातात बंदूक घेऊन फिरतात, हे चुकीचे आहे. मंत्र्यांना बिबट्या पकडायला जायची गरज काय? फॉरेस्टच्या अधिकाºयांना बिबट्या पकडायला सांगा, अशी मागणी जिल्हाधिकाºयांकडे केली. जलसंपदामंत्र्यांना फक्त शो-बाजी, स्टंटबाजीतच रस असल्याची टीका केली. त्यावर उपस्थितांमध्ये हशा पसरला. जिल्ह्यात ३-४ ठिकाणीच खरेदी केंद्र सुरू केले आहेत. मक्याचा एकरी ३०-३५ क्विंटल उतारा असताना एकरी केवळ ७ क्विंटलच धरण्याचे फर्मान काढले. उरलेला मका शेतकºयाने घरातच ठेवायचा का? असा सवालही त्यांनी केला.भाजपातच भांडणे जिल्ह्यात भाजपातच भांडणे आहेत. वरणगाव नगराध्यक्ष निवडणुकीत खडसे, महाजन स्वतंत्र व्हीप काढतात. ही शक्ती जिल्ह्यासाठी लावली असती तर शेतकरी व जनता सुखी झाली असती, असा टोलाही डॉ.पाटील यांनी लगावला.