धुळे : भोगवटा प्रमाणपत्रासाठी आयुक्तांनी नगरसेवकांना बजाविलेल्या नोटिसीनंतर सर्वच नगरसेवकांचे धाबे दणाणले आह़े त्यामुळेच अविश्वास ठरावाचे वादळ उठल्याचे स्पष्ट झाले असले तरी भोगवटा प्रमाणपत्र काढण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी मिळावा, अशी मागणी सभागृह नेते कमलेश देवरे यांनी मनपा आयुक्तांकडे पत्राव्दारे केली आह़े त्यामुळे सत्ताधारी पक्षाने भोगवटय़ासाठी आयुक्तांसमोर गुडघे टेकल्याचे चित्र दिसून येत आह़े भोगवटय़ावरूनच वादळ नगरसेवकांनी अविश्वास ठराव करण्यासाठी पुकारलेले आंदोलन आयुक्तांनी भोगवटा प्रमाणपत्रासाठी पत्र वजा नोटीस बजाविल्यानेच झाल़े आमदार अनिल गोटे यांच्या तक्रारीवरून बजाविण्यात आलेल्या नोटिसीत सात दिवसात कागदपत्रे सादर करावीत, असे नमूद करण्यात आले होत़े 12 तारखेला बजाविण्यात आलेल्या नोटिसींचा सात दिवसांचा कालावधी रविवारी संपुष्टात आला़ त्याआनुषंगाने सभागृह नेते कमलेश देवरे यांनी नोटीस बजाविण्यात आलेल्या सर्व नगरसेवकांच्या बाजूने आयुक्तांना पत्र दिले आह़े पुरेसा कालावधी हवा आयुक्तांनी नगरसेवकांना नोटिसा बजाविल्या असल्या तरी बहुतांश नगरसेवकांचे बांधकाम जुने असून त्यांना बांधकाम परवानगीदेखील घ्यावी लागणार आह़े मात्र सात दिवसांच्या कालावधीत ते शक्य नसल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आह़े दोन्ही बाजूने प्रयत्न नगरसेवकांनी एकीकडे आयुक्तांसमोर गुडघे टेकत मुदतवाढ मागितली असली तरी दुसरीकडे नगररचना विभागाकडे तगादा लावून बांधकाम परवानगीसह भोगवटय़ासाठीदेखील प्रयत्न सुरू केल्याचे दिसून येत आह़े आतार्पयत 12 नगरसेवकांनी भोगवटा प्रमाणपत्रासाठी अर्ज दिले असून अन्य नगरसेवक बांधकाम परवानगीसाठीच प्रयत्नशील असल्याचे दिसून येत आह़े अपात्रतेची भीती कायम नगरसेवकांनी भोगवटा प्रमाणपत्रासाठी मुदतवाढ मिळावी यासाठी आयुक्तांना पत्र दिले असून अनेक नगरसेवकांना भोगवटा प्रमाणपत्र न घेणे अंगाशी येऊ शकते, असे वाटत आह़े त्यामुळे वैयक्तिक पत्रही दिले जात आह़े आयुक्तांनी याबाबत एक महिन्याची मुदतवाढ दिली जाईल, असे यापूर्वीच स्पष्ट केले आह़े त्यामुळे तीन महिन्यांची मुदतवाढ दिली जाते किंवा नाही, हे अजून स्पष्ट झालेले नाही़ महासभेत ठराव होणार? मंगळवारी बोलाविण्यात आलेल्या विशेष महासभेत, आयुक्तांनी अपात्रतेची कारवाई करण्यापूर्वी न्यायाधीशांची परवानगी घ्यावी, असा ठराव केला जाणार आह़े मात्र अजून कोणावरही अपात्रतेची कारवाई झालेली नसताना या ठरावाची घाई का? नगरसेवकांना अपात्रतेची भीती असल्यानेच सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसकडून सावध पावले उचलली जात असल्याचे दिसून येत आह़े भोगवटा प्रमाणपत्राचे प्रकरण अंगाशी येणारच, असे काही नगरसेवकांनी बैठकीतही सांगितल़े दरम्यान मुदतवाढ मिळावी असे पत्र देतानाच आमदार गोटे यांनी केलेल्या तक्रारीची प्रतही मिळावी, असे पत्रात नमूद करण्यात आले आह़े
भोगवटय़ासाठी नगरसेवकांनी टेकले गुडघे?
By admin | Updated: October 18, 2015 23:52 IST