शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात डेंग्यूच्या खोटय़ा माहितीने नगरसेवकांचा संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2017 13:01 IST

रोगराई नियंत्रणासाठी उपाययोजना करा : मनपा स्थायी समितीच्या सभेत मागणी; मनपा रुग्णालयांमध्ये उपचारास टाळाटाळ

ठळक मुद्दे25 स्प्रे पंप वापराविना सापडलेडेंग्यूचे सर्वाधिक 87 रुग्ण रामानंदनगर परिसरात

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 23 - डेंग्यूच्या रूग्णांवर महापालिकेच्या रूग्णालयात उपचार न करता त्यांना खाजगी रुग्णालयात पाठविले जाते. शहरात डेंग्यूचे 1200 च्यावर रूग्ण असताना केवळ 433 चा आकडा सांगितला जातो, ही आकडेवारी खोटी आहे. वस्तुस्थिती सादर करू शकत नसल्यास अधिका:यांवर कारवाई करा अशी मागणी करून शहरात उपाय योजनांना गती देण्याची मागणी मनपा स्थायी समितीच्या सभेत शुक्रवारी सदस्यांनी केली. महापालिका स्थायी समितीची सभा दुस:या मजल्यावरील सभागृहात सभापती वर्षा खडके यांच्या अध्यक्षतेखाली झाली. विषय पत्रिकेवरील विषयांवर चर्चा झाल्यानंतर शहरात सुरू असलेल्या डेंग्यूच्या साथीवर तब्बल एक तास चर्चा झाली. महापालिका वैद्यकीय विभाग, आरोग्य विभाग डेंग्यूवर नियंत्रण मिळविण्यात कमी पडत असल्याचा टीका प्रारंभी भाजपाचे नगरसेवक पृथ्वीराज सोनवणे यांनी केली. शहरात डेंग्यूचे रूग्ण 1200 वर असल्याचा दावा केला जाताच सभापती वर्षा खडके यांनी प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. राम रावलाणी यांना माहिती सादर करण्याचे आदेश केले. शहरात डेंग्यू सदृश्य तापाचे 433 रूग्ण असून 43 जणांचे रक्त नमुने तपासणीस पाठविले असता 13 जणांना डेंग्यू असल्याचा अहवाल प्राप्त झाला असल्याचे डॉ. रावालाणी यांनी सांगितले. मनपा रूग्णालयात प्लेटलेट देण्याची सुविधा नसल्याने तसे रूग्ण असल्यास त्यांना बाहेर किंवा जिल्हा सामान्य रूग्णालयाकडे पाठविले जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट                     केले. छत्रपती शाहू महाराज रूग्णालयात महापौर ललित कोल्हे यांनी भेट दिली असता तेथे 25 स्प्रे पंप वापराविना नवेच्या नवे पडून असल्याचे लक्षात आले. या स्प्रे पंपांचा वापर शहरात जंतूनाशके फवारण्यासाठी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तर 8 फॉ¨गंग मशिन शनिवारी येथे प्राप्त होणार असल्याचेही कोल्हे यांनी सांगितले. डेंग्यू सदृश्य रूग्णांची चार टप्प्यात वर्गवारी करण्यात आली आहे. यात अ  ते ड असे क्रम देण्यात आले आहेत. अ मध्ये सर्वाधिक रूग्ण आहेत. हा दर्जा रामानंद नगर परिसराला देण्यात आला आहे. यात जीवन नगर, शास्त्री नगर, भूषण कॉलनी, अंबिका हौसिंग सोसायटी, पार्वती नगर, रूख्मिणी नगर, श्रद्धा कॉलनी भागात जवळपास 87 रूग्ण आढळून आले आहेत.  पिंप्राळा परिसरातही थैमान आदर्श नगर परिसर व उपनगरात 15 ते 20, पिंप्राळ्यातील गुरूदत्त हौसिंग सोसायटी, सिल्क मिल परिसर व अन्य भागात 15 ते 20 भोईट नगर परिसर वाघुळदे नगर, एस.एम.आय.टी. परिसर भागात 12 ते 15 रूग्ण असल्याचा अहवाल आहे. यासह मेहरूण परिसरातही डेंग्यू सदृश्य तापाचे रूग्ण आढळून येत आहेत. महाबळला 56 रुग्ण महाबळ परिसरातील महाबळ कॉलनी, हनुमान कॉलनी, देवेंद्र नगर, नागेश्वर कॉलनी,  संभाजी नगर, मोहाडी रोड,  मोहन नगर, तिवारी  नगर भागात जवळपास 56 रूग्ण आहेत.