शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

शिवाजीनगर पुलाच्या कामात अडथळा आणला तर मनपा येणार अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2018 17:34 IST

कोर्टाच्या आदेशाच्या अवमाननेची भिती

ठळक मुद्दे आधीच मनपाने ढकललीय जबाबदारीपर्यायी रस्ते असतानाही मागणी रेल्वेने मक्तेदाराला कार्यादेश देऊनही काम खोळंबले

लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव : शिवाजीनगर उड्डाणपुलाचा खर्च पेलवणार नसल्याने रेल्वे व सार्वजनिक बांधकाम विभागाकडे ढकलल्यानंतर शिरजोर झालेल्या महापालिकेने पर्यायी रस्ता दिल्याशिवाय शिवाजीनगर पूल न पाडण्याचे पत्र रेल्वेला देत कामात अडथळा आणला आहे. मात्र त्यामुळे मनपाला न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केल्याच्या कारवाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.ब्रिटीशकालीन शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपूल १०० वर्षांहून अधिक जुना झाल्याने जीर्ण झाला असल्याने तो कधीही कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे तातडीने या पुलाचे काम करण्याची मागणी होत होती. मात्र हे काम कोणी करावयाचे? यावरच चालढकल सुरू होती. रस्ता मनपाच्या ताब्यात असल्याने मनपानेच या पुलाचे काम करावे, अशी रेल्वेची भूमिका होती. मात्र मनपाची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने मनपाने पूल बांधणे शक्य नसल्याची व हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाचा असल्याने त्यांनी त्याचा निम्मा खर्च करावा, अशी मागणी शासनाकडे केली होती. पूल कोसळून नागरिकांच्या जिवाला धोका उद्भवू नये म्हणून रेल्वे व शासनाने या उड्डाणपुलाचे काम करावे, असे ठरले.मात्र त्यावर निर्णय अंतिम होत नव्हता. याबाबत माहिती अधिकार कार्यकर्ते दीपक गुप्ता यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल करून पुलाचे काम तातडीने करण्याचे आदेश देण्याची मागणी केली होती. त्यावर न्यायालयात रेल्वेने त्यांच्या हद्दीतील काम तातडीने करण्याचे लेखी आश्वासन दिले. त्यानुसार निविदाही प्रसिद्ध करून अंतिम केली. तसेच मक्तेदाराला कार्यादेशही दिले. तर सार्वजनिक बांधकाम विभागाने आम्ही शासनाला कळवतो. शासन आम्हाला याबाबत सूचना देईल, असे सांगताच कोर्टाने सार्वजनिक बांधकाम विभागाला फटकारून किती दिवसांत पुलाच्या जोडरस्त्यांचे काम करणार? ते कोर्टाला सांगा, असे सुनावले आहे. त्यामुळे आता पुढील तारखेला सार्वजनिक बांधकाम विभागाकडून याबाबत प्रतिज्ञापत्र दाखल केले जाणार आहे.पर्यायी रस्ते असतानाही मागणीशिवाजीनगर पुलाचे हे काम रेल्वे प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभागाकडून होणार आहे. हा विषय महापालिकेचा नाही, पुलाच्या कामासाठी महापालिकेने यापूर्वीच ना-हरकत दिली आहे. सध्या अस्तित्वात असलेले सूरत रेल्वे गेट आणि ममुराबाद स्मशानभूमीजवळ पुलाखालून पर्यायी रस्ते असल्याचे शहर अभियंता बी.डी. दाभाडे यांनी स्थायी समितीच्या सभेत स्पष्ट केले. असे असताना त्यांनी रेल्वेला आधी पर्यायी मार्ग करण्याबाबत पत्र देऊन कामात खोडा घालण्याचे कारण काय? असा सवाल उपस्थित झाला आहे.--------...तर मनपा अडचणीतआर्थिक परिस्थितीचे कारण दाखवत जबाबदारी ढकलणाºया मनपाच्या नगरसेवकांना आता पुलाचे काम मार्गी लागल्यावर नागरिकांच्या गैरसोयीचा पुळका आला आहे. शहर अभियंत्यांनी याबाबत कुणाशी चर्चा करून रेल्वेला पर्यायी रस्त्यांबाबत पत्र दिले? मनपाच्या आयुक्तांशी चर्चा केली होती का? असा सवाल उपस्थित होत आहे. कारण रेल्वेने कोर्टात लेखी आश्वासन दिलेले असताना रेल्वे उड्डाणपुलाची कुठलीही जबाबदारी न घेणारी मनपा मात्र पर्यायी रस्त्यांच्या अटी घालून शिवाजीनगर पुलाच्या कामात अडथळा आणणार असेल तर न्यायालयाच्या आदेशाचा अवमान होऊन संबंधीत अधिकारी अडचणीत येण्याची शक्यता आहे.