शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
3
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
5
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
6
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
7
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
8
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
9
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
10
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
11
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
12
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
13
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
14
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
15
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
16
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
17
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
18
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
19
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
20
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला

महामंडळाच्या बसेस शिरूर मार्गे पुण्याला जाणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:16 IST

दरवर्षी येथील ऐतिहासिक विजय स्तंभला मानवंदना व अभिवादन करण्यासाठी लाखो अनुयायी येत असतात; मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मानवंदना कार्यक्रम ...

दरवर्षी येथील ऐतिहासिक विजय स्तंभला मानवंदना व अभिवादन करण्यासाठी लाखो अनुयायी येत असतात; मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मानवंदना कार्यक्रम साध्या पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले आहे, तसेच या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर शिक्रापूर पोलीस ठाणे हद्दीत येणाऱ्या शिक्रापूर ते चाकण दरम्यानची वाहतूक ३१ डिसेंबरला सायंकाळी ५ वाजतापासून १ जानेवारी २०२१ रोजी रात्री १२ पर्यंत सर्व प्रकारची वाहतूक बंद ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे शिक्रापूर मार्गे पुण्यात जाणाऱ्यांना इतर पर्यायी मार्गाने जाण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

इन्फो :

जळगाव विभागाच्या बसेस शिरूर मार्गे पुण्यात जाणार :

पुणे जिल्हा प्रशासनातर्फे शिक्रापूर-चाकण दरम्यानची वाहतूक शुक्रवारी रात्री मध्यरात्रीपर्यंत बंद राहणार असल्यामुळे, एसटी महामंडळाच्या जिल्हाभरातून औरंगाबाद नगरमार्गे पुण्याला जाणाऱ्या बसेस शिरूर पारगाव व हडपसर मार्गे पुण्याकडे जाणार आहेत. तर पुण्याकडूनही याच मार्गे येणार आहेत. वाहतुकीच्या बदलाबाबत पुणे जिल्हाधिकाऱ्यांचे पत्र नुकतेच जळगाव विभागाला प्राप्त झाले आहे. या पत्रानुसार वाहतुकीच्या नियोजनाबाबत संबंधित आगारांना सूचना केल्याचे विभागीय वाहतूकचे दिलीप बंजारा यांनी सांगितले. दरम्यान, जिल्हाभरातील अकरा डेपोंमधून सध्या दिवसभरात ३० बसेस पुण्याकडे जात असल्याचेही बंजारा यांनी सांगितले.