शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

शून्य खर्चात कोरोनाला केली गावबंदी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2020 20:48 IST

जळोद : अभियंत्याचा जुगाड : शेती साहित्यातून आयुर्वेदिक सॅनिटायझर खोली

संजय पाटीलअमळनेर : तालुक्यातील जळोद येथील तरुण अभियंत्याने जुगाड लावून शेतीच्या साहित्यातून आयुर्वेदीक सॅनिटायझर खोली बनवून आपले गाव सुरक्षित केले आहे.अमळनेर तालुक्यातील जळोद येथील प्रशांत सोनवणे हा पुण्याला यांत्रिक अभियंता म्हणून काम करतो. लॉक डाऊनमुळे तो गावी आलेला आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता ग्रामीण भागात सुविधा नाही. शेतकऱ्यांचे सतत शेतात बाहेर जाणे येणे, माल विक्रीस तालुक्यावर जाणे येणे सुरू राहते. तसेच निष्काळजीपणा, गरिबीमुळे महागडे सॅनिटायझर वापरणे शक्य नाही. मात्र कोणत्याही परिस्थितीत गाव सुरक्षित असणे गरजेचे आहे. म्हणून या तरुणाने शक्कल लढवित हे यंत्र तयार केले.असे केले नियोजनशेतीचे साहित्य फवारणी पम्प, एयर ब्लोअर आदी वापरून गावाबाहेर या तरुणाने एक खोली तयार केली आहे. रासायनिक सॅनिटायझर सतत लावल्याने ने शरीराला त्रासदायक होऊ शकते म्हणून त्याने निंब, कोरफड, तेजपान, निलगिरी, भीमसेनी कापूर वापरून आयुर्वेदिक सॅनियझर तयार केले आहे. या यंत्राला वीज पुरवठा जोडण्यात आला आहे. गावाबाहेर गेलेला शेतकरी गावात परतल्यावर अथवा नवीन व्यक्ती गावात आल्यावर गावाबाहेरील प्रवेशद्वारावर खोलीजवल दोन तरुण त्यांना थांबविले जाते. १० सेकंद ती व्यक्ती स्वत:भोवती गोल फिरते त्यावेळी बटन दाबून त्याच्या अंगावर सॅनिटायझर फवारा मारला जातो. ती व्यक्ती निर्जतुक होऊनच गावात शिरते. त्यामुळे कोरोना पासून गाव सुरक्षित झाले आहे.गावातील युवकांची मदतप्रशांत सोनवणेला याला या उपक्रमासाठी गावातील मनोज चौधरी, सत्यपाल चौधरी, आर.एस.सोनवणे, देवराम चौधरी यांचे सहकार्य लाभले आहे. त्याच्या या शून्य खर्चाच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. ग्रामीण अथवा शहरी भागात असे सॅनिटायझर रूम बनवायचे असतील तर तो मोफत मार्गदर्शन करणार आहे.---कोटनिंब, कोरफड, निलगिरी, कापूर, तेजपान हे आयुर्वेदिक घटक जंतुनाशक आहेत. प्रमाणात सेवन केल्यास मानवी प्रतिकार शक्ती वाढते. मात्र त्याची फवारणी केल्यास कोरोना विषाणू जाणार नाही. त्यासाठी शासनाने ठरवलेले सॅनिटायझर योग्य आहे.- डॉ.दिलीप पोटोडे, जिल्हा वैद्यकीय अधिकारी.