शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

सहकारी संस्थांच्या निवडणुकांवर पुन्हा कोरोनाचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मार्च २०२० ते डिसेंबर २०२० पर्यंत मुदत संपलेल्या सहकारी संस्थाच्या निवडणुका अद्यापही ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मार्च २०२० ते डिसेंबर २०२० पर्यंत मुदत संपलेल्या सहकारी संस्थाच्या निवडणुका अद्यापही होवू शकल्या नाहीत. जानेवारीनंतर कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर ग्रामपंचायतीच्या निवडणुका घेतल्या होत्या. या निवडणुका झाल्यानंतर शासनाने कोविडमुळे थांबलेल्या सर्व मुदत संपलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्यास हिरवी झेंडी दाखविली आहे. यासाठी प्रशासनाकडून प्रक्रियादेखील सुरू झाली आहे. मात्र, गेल्या आठवडाभरापासून कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने पुन्हा सहकारी संस्थाच्या निवडणुकांना ‘ब्रेक’ लागण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यातील १११८ सहकारी संस्थांची मुदत संपली आहे. यामध्ये जिल्हा बँक, ग.स.सोसायटी, बाजार समित्या, जिल्हा दूध संघ, मविप्र या मोठ्या संस्थाचाही सहभाग आहे. जानेवारीनंतर कोरोना रुग्णांची संख्या कमी होवू लागल्यानंतर सहकार व पणन मंत्रालयाने सर्व थांबलेल्या निवडणुका टप्प्याटप्प्याने घेण्याचा सूचना दिल्या होत्या. त्याची तयारीदेखील सुरू झाली आहे. जिल्हा बँक व दूध संघाच्या निवडणुकीसाठी मतदार याद्यांचे कामदेखील सुरू झाले आहे. मात्र, आठवडाभरातच जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. ही संख्या संपूर्ण राज्यभरातच वाढत आहे. यामुळे शासनाकडून पुन्हा या निवडणुकांना ब्रेक लावण्यात येण्याची शक्यता आहे.

सहा टप्प्यांत घेण्यात येतील निवडणुका

सर्व निवडणुका आता मुदत संपलेल्या कार्यकाळानुसार घेण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात ८३ सहकारी संस्थांच्या निवडणुका होतील. दुसऱ्या टप्प्यात ३१ डिसेंबर २०१९ रोजी मुदत संपलेल्या २०४ संस्थांच्या, तिसऱ्या टप्प्यात ३१ मार्च २०२० रोजी मुदत संपलेल्या ६०९ संस्थांच्या, चौथ्या टप्प्यात ३० जून २०२० पर्यंत मुदत संपलेल्या ८० संस्थांच्या तर पाचव्या टप्प्यात ३० सप्टेंबर २०२० पर्यंत मुदत संपलेल्या ९० व शेवटच्या टप्प्यात ३१ डिसेंबर २०२० पर्यंत मुदत संपलेल्या ५२ अशा एकूण १११८ सहकारी संस्थांच्या निवडणुका पार पडणार आहेत. दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना, शासनाकडून अद्यापपर्यंत निवडणुकांबाबत कोणताही आदेश आला नसल्याने निवडणुकीची प्रक्रिया सुरूच आहे.

कोट..

कोरोना रुग्णांची संख्या जर वाढत जात असेल तर शासनाने निवडणुकांबाबत विचार करावा, निवडणुका येत-जात राहतील. मात्र, कोरोनाचे संकट पुन्हा वाढत असेल तर शासनाला हे संकट आधी थांबविणे गरजेचे आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला तर निवडणुकांबाबत विचार झाला पाहिजे.

-गुलाबराव देवकर, संचालक, जिल्हा मध्यवर्ती बँक

ग. स. किंवा इतर सहकारी संस्थाच्या निवडणुकांना आधीच उशीर झाला आहे. अशा परिस्थितीत आता निवडणुकांना ब्रेक लावणे चुकीचे आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता, ग. स. निवडणूक ही आता ईव्हीएम मशीनद्वारे घेतली पाहिजे. जेणेकरून या निवडणुकीसाठी लागणारी कर्मचारीसंख्या कमी होईल.

-उदय पाटील, गटनेते, सहकार गट, ग. स. सोसायटी