बी.एस.चौधरीएरंडोल, जि.जळगाव : कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी सर्वत्र ‘लॉकडाऊन’ करण्यात आलेला आहे. याचा सर्वाधिक फटका तालुक्यातील शेतमजूर, बांधकामावर जाणारे मजूर, कापड दुकानासह इतर दुकानांवर काम करणारे मजूर यासारख्या हातावर पोट भरणाऱ्या मजुरांचे हाल होत आहेत. त्यांची रोजी-रोटी थांबल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. आता उदरनिर्वाह कसा करावा, असा प्रश्न या घटकांना त्रस्त करीत आहे.एरंडोल तालुक्यात मजूर, कामगार, गरीब लोक, किरकोळ विक्रेते, हमाल, मुरमुरे फुटाणे विकणारे या घटकांना कोरोनाचा जबरदस्त फटका बसला आहे. यांच्या घरात चूल कशी पेटणार याची चिंता व्यक्त केली जात आहे. एरवी राजकीय क्षेत्रातील नेते व कार्यकर्ते गरिबांच्या मदतीसाठी धावून येण्यासाठी विविध उपक्रम राबवत असतात. विशेष करून निवडणूक काळात जनतेबद्दल त्यांच्या प्रेमाला बहर येतो. मात्र कोरोनाच्या काळात सर्वांनी गरिबांकडे पाठ फिरवली आहे. या उपेक्षित लोकांना मदतीसाठी राजकीय क्षेत्रातील व्यक्ती, सेवाभावी संस्थांचे पदाधिकारी, महिला मंडळाचे पदाधिकारी यांनी मजूर कामगार व गरीब लोकांच्या मदतीसाठी पुढे आले पाहिजे असे जाणकारांचे मत आहे. एरवी फोटो, बातम्यांसाठी चमकोगिरी करणारी मंडळी गरिबांच्या मदतीसाठी कुठेही दिसून येत नाही. पालिका प्रशासनाने याकामी लक्ष घालून गरजू लोकांना आर्थिक मदत देण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी होत आहे.
कोरोनाची महामारी अन् गरिबांची उपासमारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2020 23:28 IST
कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी सर्वत्र ‘लॉकडाऊन’ करण्यात आलेला आहे. याचा सर्वाधिक फटका तालुक्यातील शेतमजूर, बांधकामावर जाणारे मजूर, कापड दुकानासह इतर दुकानांवर काम करणारे मजूर यासारख्या हातावर पोट भरणाऱ्या मजुरांचे हाल होत आहेत.
कोरोनाची महामारी अन् गरिबांची उपासमारी
ठळक मुद्देआता उदरनिर्वाह कसा करावा, असा प्रश्न या घटकांना त्रस्त करतोय लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेण्याची अपेक्षाहातावर पोट भरणाऱ्या मजुरांचे हाल