लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्ह्यातील १४ तालुक्यांमध्ये कोरेाना नियंत्रणात असताना चाळीसगावात मात्र, रोजी दोन ते तीन रुग्ण समोर येत आहेत. चाळीसगावात कोरोना थांबत नसल्याचे चित्र आहे. दुसरीकडे शून्यावर गेलेल्या चोपडा तालुक्यातही आता ७ सक्रिय रुग्ण झाले आहेत. त्यामानाने जळगाव शहरात परिस्थिती नियंत्रणात आहे.
जळगावात बुधवारी रुग्ण आढळून आले होते. मात्र, गुरूवारी एकही रुग्ण समोर आलेला नाही. गुरूवारी आढळून आलेल्या ९ रुग्णांपैकी ४ रुग्ण हे चाळीसगाव, २ चोपडा व २ रुग्ण पाचोरा तालुक्यात आढळून आले आहेत. तर ११ रुग्ण बरे देखील झाले आहेत. आरटीपीसीआरच्या २०७५ चाचण्यांमध्ये ३ बाधित रुग्ण आढळून आले आहे. २३०४ ॲन्टीजन चाचण्यांमध्ये ६ बाधित समोर आले आहेत. आयसीयूमधील दाखल रुग्णांच्या संख्येत दोनने वाढ झाली असून ही संख्या ७ वर पोहोचली आहे.