शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना लसीकरण ठरविणार, शाळा कधी सुरू होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:15 IST

- डमी लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : राज्यात कोरोना विषाणूने थैमान घातले असल्यामुळे गेल्या वर्षभरापासून शाळा, महाविद्यालये बंद आहेत. ...

- डमी

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : राज्यात कोरोना विषाणूने थैमान घातले असल्यामुळे गेल्या वर्षभरापासून शाळा, महाविद्यालये बंद आहेत. नवीन शैक्षणिक वर्ष १४ जूनपासून प्रारंभ होणार आहे. मात्र, यावर्षी कोरोनामुळे शाळा कधी सुरू होतील, हे सांगणे कठीण आहे. दरम्यान, सध्याची स्थिती पाहता कोरोना लसीकरणानंतरच शाळा सुरू होतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. दुसरीकडे विद्यार्थी, पालक व शिक्षकांना शाळा सुरू होण्याची प्रतीक्षा लागून आहे.

मागील वर्षाच्या मार्च महिन्यापासून शाळा बंद आहेत. काही दिवस माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेचे वर्ग भरले होते. मात्र, कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर त्या शाळा पुन्हा बंद झाल्या.‍ विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी शाळा, महाविद्यालयांनी ऑनलाईन शिक्षणावरच भर दिला. मात्र, काही दिवसांपूर्वी आरटीई अंतर्गत सर्व विद्यार्थ्यांना परीक्षा न घेताच उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला. २ मे ते १३ जूनपर्यंत उन्हाळी सुटी जाहीर झाली आहे. त्यामुळे १४ जूनपासून नवीन शैक्षणिक सत्र सुरू होईल. मात्र, सध्या कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढला आहे. कोरोना संसर्ग कमी करण्यासाठी शासन विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना करीत आहे. त्याचाच भाग म्हणून कोरोना लसीकरण मोहीम हाती घेतली आहे. सर्वांचे लसीकरण झाल्यास कोरोनाला आळा बसेल, असा विश्वास शासनाला आहे. विद्यार्थ्यांचेही लसीकरण झाल्यास शाळा सुरू करण्याचा मार्ग मोकळा होईल. मात्र, त्या वेळची कोरोना संसर्ग व लसीकरणाची स्थिती पाहूनच शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला जाईल, असे मत काही शिक्षण तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

-----------------------------------------

ऑनलाईन आणि ऑफलाईनही....

शाळा सुरू झाल्यानंतर ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पर्यायांचा उपयोग केला जाणार आहे. शासनाच्या मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्यानंतर शाळांना पुढील सूचना केल्या जाणार आहेत.

-----------------------------------------

७६ हजार विद्यार्थी थेट दुसरीत

- कोरोनामुळे २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांना परीक्षा न घेताच आरटीई अंतर्गत उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला.

- जिल्ह्यातील ७६ हजार ५१४ विद्यार्थी पहिलीत शिक्षण घेत होते. हे सर्व विद्यार्थी आता थेट दुसरीत गेले आहेत.

- शाळा सुरू झाल्यानंतर या विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके देण्याचे नियोजन शिक्षण विभागाला आखावे लागणार आहे.

- हे विद्यार्थी थेट दुसरीत गेले असले तरी एकही दिवस शाळेत गेले नाहीत. त्यामुळे हे विद्यार्थी दुसरीत गेले तरी शाळेत पहिल्यांदाच जाणार आहेत.

-------------------------------------------------

विद्यार्थी, पालक, शिक्षकही शाळेसाठी उत्सुक!

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन अभ्यास घेतला गेला. पण, वर्गात शिक्षकांनी शिकविलेले जास्त लक्षात राहते. त्यामुळे शाळा लवकर सुरू कराव्यात. तसेच विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने उपाययोजनासुद्धा शाळांमध्ये करण्यात याव्यात.

- श्लोक पाटील, विद्यार्थी

------------------------------------------------

वर्षभरापासून मुले घरीच आहेत. त्यामुळे ती कंटाळली आहेत. ऑनलाईन शिक्षण मिळते, पण प्रत्यक्ष अध्यापनात व ऑनलाईन शिक्षणात फरक असतोच. त्यामुळे यावर्षी शाळा सुरू झाल्यास पाल्याला शाळेत नक्कीच पाठविणार आहे.

- आशिष दुसाने, पालक

-------------------------------------------

शाळा सुरू व्हायलाच हव्यात. कोरोनाचा संसर्ग कमी होण्यावर सर्व अवलंबून आहे. सध्यातरी जुनी पुस्तके परत घेणे, निकाल आदी कामे सुरू आहेत.

- नीलेश पाटील, शिक्षक

--------------------------------

काय म्हणतात शिक्षणाधिकारी...

शाळांच्या संदर्भात शासनाकडून मार्गदर्शन आल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाणार आहे. शाळा सुरू झाल्यानंतर ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पर्याय असणार आहेत. कोरोनाच्या संसर्गामुळे प्रत्यक्ष शाळा उघडणे शक्य नसल्यामुळे ऑनलाईन शिक्षण देण्‍याच्या सूचना केल्या जातील.

-बी. एस. अकलाडे, प्राथमिक शिक्षणाधिकारी