शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

केवळ ३० मिनिटात होणार अमळनेर येथेच कोरोनाचे निदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2020 00:53 IST

संजय पाटील अमळनेर, जि.जळगाव : केंद्र सरकारने व राज्य सरकारने अमळनेर कोविड सेंटरला कोविड अँटीजन सेंटर म्हणून मान्यता दिली ...

ठळक मुद्देआता स्वॅब प्रयोगशाळेत पाठविण्याची गरज नाही सुविधा येथेच सुविधा

संजय पाटीलअमळनेर, जि.जळगाव : केंद्र सरकारने व राज्य सरकारने अमळनेर कोविड सेंटरला कोविड अँटीजन सेंटर म्हणून मान्यता दिली असून अवघ्या ३० मिनिटात अमळनेर येथेच रुग्णाचा कोरोनाचा अहवाल मिळणार असल्याने येथील अहवाल आता बाहेर प्रयोगशाळेत पाठवण्याची आवश्यकता नसून जिल्ह्यातील हे असे पहिलेच केंद्र आहे, असे सांगण्यात आले.अमळनेर तालुक्यात सातत्याने रुग्ण वाढत असल्याने आणि अहवाल दोन दोन दिवसांनी येत असल्याने स्वॅब तपासण्याची प्रक्रिया गतिमान होण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणेसाठी ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. प्रकाश ताडे , डॉ.संदीप जोशी व डॉ. आशिष पाटील यांनी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करून कोविड अँटीजन सेंटर म्हणून रजिस्टर नोंदणी केली. त्याला राज्य शासनाने देखील मान्यता दिली असून ग्रामीण रुग्णालयाला तातडीने २०० रॅपिड अँटीजन टेस्ट करण्याचे किट उपलब्ध करून दिले आहेत.आधीच्या टेस्ट दरम्यान कोविड सेंटरमधील रुग्णांना प्रतीक्षा करावी लागत होती. त्यांची देखभाल आदीसाठी वेळ आणि पैसा लागत होता. आता लागलीच अहवाल मिळणार असल्याने निगेटिव्ह रुग्ण तात्काळ घरी जाणार असल्याने कोविड सेंटरला होणारी आता गर्दी टळणार आहे.पहिल्याच दिवशी रॅपिड अँटीजन टेस्टने सहा जणांची चाचणी करण्यात आली. त्यात जानवे आणि ढेकू रोड येथील रुग्ण पॉझिटिव्ह तर चार निगेटिव्ह आले आहेत.काय आहे रॅपिड अँटीजन टेस्टनेहमीप्रमाणे रुग्णांचे स्वॅब आर. सी. पी. सी. आर. टेस्ट करून घेतले जात होते. त्याचे अहवाल जळगाव किंवा धुळे प्रयोग शाळेत पाठवावे लागत होते व अहवाल मिळण्यास दोन दिवस लागत होते. मात्र रॅपिड अँटीजन टेस्ट किट मुळे अवघ्या ३० मिनिटात स्वॅबचा अहवाल प्राप्त होणार असून केव्हाही स्वॅबचा अहवाल लगेच मिळवता येणार आहे. आधीच्या आर. सी. पी. सी. आर. टेस्ट मध्ये १० च्या पटीत स्वॅब घ्यावे लागत होतेसहकाऱ्यांच्या प्रयत्नाने सखोल अभ्यास करून रजिस्टर नोंदणी केल्याने जिल्ह्यातील एकमेव रॅपिड अँटीजन सेंटर ला मान्यता मिळाली आहे. यामुळे कोरोना तपासणीला गती मिळणार आहे. - डॉ. प्रकाश ताडे, वैद्यकीय अधिकारी, ग्रामीण रुग्णालय, अमळनेर

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याBhusawalभुसावळ