शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

भुसावळात कोरोना पसरतोय पाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2020 15:00 IST

शहरात कोरोनाचा कहर सुरूच आहे.

उत्तम काळेभुसावळ, जि.जळगाव : शहरात कोरोनाचा कहर सुरूच आहे. रविवारी रात्री पुन्हा एका रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. हा रुग्ण नवीन एरियात सापडल्यामुळे शहरात कोरोनाचा फैलाव सुरू असल्याचे दिसून येत आहे. प्रशासन मात्र कोरोनावर नियंत्रण मिळविण्यात अपयशी ठरले असल्याचे दिसून येत आहे.येथे रविवारी रात्री दहाला एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला आहे. फालक नगर, डी. एल. हिंदी हायस्कूलमागील बाजूस राहणारा ५५ वर्षीय या रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे शहरात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ५५ झाली आहे, तर मयत रुग्णांची संख्या १० झाली आहे. नऊ रुग्ण उपचार घेऊन घरी परतले आहेत. आता ३६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.दरम्यान, मयत रुग्णाच्या घरी रविवारपर्यंत भेटीला येणाऱ्यांची गर्दी दिसून आल्याचे सांगण्यात आले. रात्री दहाला त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर मात्र घराला कुलूप लावण्यात आले असून घरातील मंडळी कुठे गेली हे समजू शकले नाही, पालिकेतर्फे हा परिसर सील करण्याची तयारी सुरू आहे. या रुग्णाची तब्येत खराब झाल्यानंतर शहरातील दवाखाने बंद असल्यामुळे त्याने मुक्ताईनगर येथे उपचार घेतले असल्याचे सांगण्यात आले.शहरात रविवारी सर्वपक्षीय लॉकडाऊन संपले असले तरी, शासनाचे लॉकडाऊन ३१ मेपर्यंत वाढवण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांनी कामाव्यतिरिक्त घराबाहेर पडू नये व शासनाचे आदेश तंतोतंत पाडावे, असे आवाहन आमदार संजय सावकारे, प्रांताधिकारी रामसिंग सुलाने, डीवायएसपी गजानन राठोड, जिल्हा परिषद सदस्या पल्लवी सावकारे आदींनी केले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याBhusawalभुसावळ