शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना सुरु होताच गाव गाठले, कामासाठी आता मुंबई, पुण्यात पोहचले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:13 IST

जळगाव : कोरोना संसर्ग सुरू झाल्यानंतर, गावाकडे परतलेले नागरिक आता पुन्हा आपल्या कामाच्या ठिकाणी परतू लागले आहेत. शासनाने अनलॉक ...

जळगाव : कोरोना संसर्ग सुरू झाल्यानंतर, गावाकडे परतलेले नागरिक आता पुन्हा आपल्या कामाच्या ठिकाणी परतू लागले आहेत. शासनाने अनलॉक केल्यामुळे परप्रांतातून येणाऱ्या बांधवांसह स्थानिक नागरिकही आपल्या कुटुंबासह रोजगारासाठी मुंबई, पुणे, गुजरात, मध्यप्रदेश या भागामध्ये परत येऊ लागले आहेत. विशेष: विदेशात नोकरीसाठी वास्तव्य करणारे नागरिकही आता परतू लागले आहेत. यामध्ये मुंबई व पुण्याकडे जाणाऱ्यांची सर्वाधिक गर्दी दिसून येत आहे.

शासनाने गेल्या वर्षाप्रमाणे यंदाही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडक लॉकडाऊन लागू केला होती. अत्यावश्यक सेवा वगळता, सर्व उद्योग-व्यवसाय बंद ठेवले होते. यामुळे मुंबई, पुण्यासह परप्रांतात काम करणारे अनेक नागरिक आपल्या कुटुंबासह गावाकडे परतले होते. मात्र,महाराष्ट्रातील सर्व ठिकाणची कोरोना रूग्णांची संख्या कमी झाल्यानंतर, पर प्रांतीय बांधव मोठ्या संख्येने महाराष्ट्रात येत असतांना, दुसरीकडे स्थानिक नागरिक आपल्या कुटुंबासह पुन्हा मुंबई, पुणे व परराज्यात कामासाठी परत येत आहेत. यामुळे मुंबई, पुण्याकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्यांना सर्वाधिक गर्दी दिसून येत आहे. दुसऱ्या लाटेनंतर हजारो बांधव मुंबई-पुण्याकडे गेले असल्याचे संबंधित विभागांतर्फे सांगण्यात आले.

इन्फो :

परदेशात ५० हून अधिक नागरिक गेेले

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे परदेशात नोकरीला असणारे अनेक नागरिकही मायदेशी परतले होते. मात्र, विदेशातही कोरोनाचे रूग्ण कमी झाल्यानंतर अमेरिका, इटली, ब्रिटन या ठिकाणी पुन्हा नागरिक रवाना होत आहेत. जळगावात पासपोर्ट कार्यालय झाल्यामुळे, पासपोर्ट नवीन काढणे व नुतनी करणासाठी नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर अर्ज येत आहेत. त्यावरून सध्या ५० पेक्षा अधिक जण हे विदेशात गेले असल्याचे पासपोर्टच्या सुत्रांनी सांगितले.

इन्फो :

पर राज्यातही गेले २० हजार बांधव

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या भितीने सुरत, अहमदाबाद, बडोदा, बंगळुरू, खंडवा, बऱ्हानपूर या ठिकाणाहूनही हजारो नागरिक गावाकडे परतले होते. मात्र, गेल्या महिन्यापासून कोरोनाचे प्रमाण कमी झाल्यानंतर, गावी आलेले हे बांधव पुन्हा आपआपल्या कामाच्या ठिकाणी परतू लागले आहे. विशेष म्हणजे गुजरात व मध्यप्रदेशात जाणाऱ्या गाड्यांना सर्वाधिक तिकीट बुकींगही जळगाव व भुसावळहून झाल्यामुळे, गेल्या महिनाभरात २० हजाराहून अधिक बांधव पर राज्यात रवाना झाले आहेत.

इन्फो :

सर्वाधिक स्थलांतर मुंबईकडे

कोरोनामुळे गेल्या वर्षी आणि यंदा दुसऱ्या लाटेच्या भितीनेदेखील मुंबई-पुण्यात नोकरीनिमित्त वास्तव्यास असणारे अनेक नागरिक गावाकडे परतले होते. दुसरी लाट संपल्यानंतर हे नागरिक पुन्हा आपल्या कुटुंबासह पुणे व मुंबईकडे परतू लागले आहेत. रेल्वे सुत्रांनी व खाजगी ट्रॅव्हल्स कंपन्यांनी त्यांच्याकडे महिनाभरात झालेल्या तिकीट बुकींग नुसार ४० हजाराहून अधिक नागरिक मुंबई व पुण्याकडे रोजगारासाठी पुन्हा परतले आहेत.

इन्फो :

मुले परदेशात, चिंता भारतात..

आधीच मुले नोकरीनिमित्त परदेशात असल्यामुळे, ती चिंता लागूनच असते. त्यात आता कोरोना सारखे आजार आल्यामुळे, खुपच चिंता वाटते. मुले भारतात राहिल्यावर तात्काळ भेटण्यासाठी निघता येते. विदेशात राहत असल्याचे म्हटल्यावर लगेच पोहचण्यासारखे नसते. त्यामुळे माझा मुलगा अमेरिकेत असल्यामुळे, त्यांची सतत काळजी वाटत असते.

चंद्रकला महाले