लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शुक्रवारी पुन्हा एकदा ३१८ रुग्ण आढळून आल्याने जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या अखेर ६० हजार पार होऊन ६०१८२ वर पोहोचली आहे. दोन बाधितांच्या मृत्यूची नोंद झाली असून यात एका ५२ वर्षीय रुग्ण महिलेचा समावेश आहे. शहरात पुन्हा एकदा कोरोनाने शंभरी पार केली आहे.
जळगाव शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या अत्यंत झपाट्याने वाढत असून ही संख्या काहीच दिवसात १०२१ वर पोहोचली आहे. दुसरीकडे भुसावळ, चोपडा, चाळीसगावात संसर्ग वाढत असल्याचे गंभीर चित्र कायम आहे. भुसावळ तालुक्यात दोन महिलांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृतांची संख्या १३८३ वर पोहोचली आहे. शुक्रवारी १३५ रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी पाठविण्यात आले.
२५०० चाचण्यात
नियमित होणाऱ्या चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यात आले आहे. यात शुक्रवारी १५४१ आरटीपीसीआर चाचण्या झाल्या तर ९५३ ॲन्टिजन चाचण्या झाल्या. यासह १२३४ आरटीपीसीआर चाचण्यांचे अहवाल समोर आले.
पॉझिटिव्हिटी
आरटीपीसीआर : ११.२६ टक्के
ॲन्टिजन : १८. ७८ टक्के