शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

‘कोरोना’ची झडप, २० दिवसात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2020 00:25 IST

कोरोना महामारीत २० दिवसातच एका पाठोपाठ एकाच कुटुंबातील ४ सदस्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना तालुक्यातील साकरे गावात घडली.

ठळक मुद्देबापही नियतीपुढे झुकलाभावापाठोपाठ दोन्ही लेकरांचा मृत्यूनुसत्या विचारातूनच मन सुन्न

धरणगाव, जि.जळगाव : कोरोना महामारीत २० दिवसातच एका पाठोपाठ एकाच कुटुंबातील ४ सदस्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना तालुक्यातील साकरे गावात घडली. अमृतकर कुटुंबातील तिघा कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. लेकराच्या मृत्यूचा घाव सहन न झाल्याने ८५ वर्षीय वृद्ध पित्याला हृदयविकाराने हेरले आणि तिथेच क्रूर काळाने मृत्यूची चौकट साधली.साकरे येथे राहणारे पण सध्या धरणगावच्या चिंतामणी मोरया परिसरात राहणाऱ्या अमृतकर परिवारातील जबाबदार माणसे अकाली मरण पावल्याने परिवाराची घडी विस्कटली आहे. साकरे येथील शेती आणि खत विक्रेते आपला उदरनिर्वाह करणारे अमृतकर कुटुंब मेहनती आणि सालस कुटुंब म्हणून ओळखले जाते. कुटुंबातील सर्वात आधी शांताराम गोपाल अमृतकर (७५) यांचे कोरोना सदृश आजाराने निधन झाले. त्यानंतर सुनील पुंडलिक अमृतकर (५२) यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने जळगावी खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना ३० सप्टेंबर रोजी, तर सतीश पुंडलिक अमृतकर (५०) यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने जळगावच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना १ आॅक्टोबर रोजी निधन झाले, तर २ आॅक्टोबर रोजी आधी भावाचा आणि नंतर दोन्ही मुलांच्या निधनाचा धक्का सहन न झाल्याने घरचे वयोवृद्ध पुंडलिक गोपाल अमृतकर (८५) यांचीही हृदयविकाराने प्राणज्योत मालवली. एकापाठोपाठ एक अमृतकार परिवारावर काळाने असा घाला घातला की सारा गावच सुन्न झाला. कोरोनाच्या महामारीत अमृतकर कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे. एकत्र कुटुंब असल्याने तेरा सदस्य आनंदात राहत होते. परंतु आनंदी कुटुंबावर नियतीने घाला घातल्याने कुटुंबातील कर्ते पुरुष गेले आणि कुटुंबाचा आधार राहिलेला नाही. शिवाय शेती, व्यवसायासाठी बँका, वि. का. सोसायटी, उसनवार असे कर्जदेखील आहे. अशावेळी घरातील महिला, लहान मुले हा भार कसा पेलतील हा प्रश्न कुटुंबासमोर उभा आहे.नुसत्या विचारातूनच मन सुन्नकोरोनाच्या उपचारासाठी लाखो रुपये खर्च झाले. एकाच्या दु:खातून कुटुंब सावरत नाही; तोपर्यंत दुसरी दु:खद घटना घडत आहे. गेल्या महिनाभरापासून या कुटुंबाची काय अवस्था असेल याचा नुसता विचार केला तरी मन सुन्न होत आहे. एकामागे एक घटना घडत राहिल्याने कोरोनाची प्रचंड भीती कुटुंबातील अन्य सदस्यांमध्ये तसेच गावातही निर्माण झाली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDharangaonधरणगाव