शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे स्टेशनवरील नवीन दादऱ्यावर कोरोना तपासणीला फाटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : परराज्यातील रेल्वे गाड्यांमधून उतरणाऱ्या प्रवाशांची कोरोना तपासणी करण्यासाठी मनपा आरोग्य विभाग व रेल्वे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : परराज्यातील रेल्वे गाड्यांमधून उतरणाऱ्या प्रवाशांची कोरोना तपासणी करण्यासाठी मनपा आरोग्य विभाग व रेल्वे यांच्या संयुक्त विद्यमाने स्टेशनवरील मुख्य दादऱ्यावर आरोग्य पथक नियुक्त करण्यात आले आहे. हे पथक प्रवाशांना थांबवून प्रत्येकाचे थर्मल गणद्वारे शरीराचे तापमान तपासण्यासह त्यांचे नाव, पत्ता व मोबाइल नोंदवूनच प्रवाशांना बाहेर सोडत आहे; मात्र दुसऱ्या बाजूच्या दादऱ्यावर तपासणीसाठी कुठलेही पथक नसल्यामुळे अनेक प्रवासी तपासणीविनाच बाहेर पडत आहे. संबंधित यंत्रणेने या प्रकाराकडे सपशेल कानाडोळा केला आहे. मनपा आरोग्य विभागाने कर्मचारी नसल्यामुळे मुख्य दादऱ्यावरच पथक असल्याचे सांगत हात झटकले आहेत.

कोरोनाची दुसरी लाट सुरू झाल्यापासून राज्य शासनाने दिल्ली, गुजरात, गोवा, कर्नाटक, पश्चिम बंगाल व केरळ या राज्यातून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशांची अँटिजन चाचणी करण्याच्या सूचना रेल्वे प्रशासन व जिल्हा प्रशासनाला केल्या आहेत. त्यानुसार जळगाव रेल्वे स्टेशनवर मनपा व रेल्वे विभाग मिळून स्वतंत्र पथक नियुक्त करण्यात आले आहे. हे पथक २४ तास या ठिकाणी कार्यरत असून, परराज्यातून येणाऱ्या गाड्यांमधील प्रत्येक प्रवाशांची तपासणी व त्या प्रवाशांचे नाव, पत्ता, मोबाइल नंबर आदी नोंदी घेत आहे.

स्टेशनवरील मुख्य दादऱ्यावर हे पथक तैनात असून, गाडी आल्यानंतर आरोग्य विभागाची पंधरा ते वीस मिनिटे ही प्रक्रिया सुरू असते. दररोज १०० ते १५० प्रवाशांची अशा प्रकारे तपासणी करण्यात येत असल्याचे येथील कर्मचाऱ्यांनी सांगितले; मात्र फ्लॅटफार्म क्रमांक १,२ ला जोडून असलेल्या नवीन दुसऱ्या दादऱ्यावरून तपासणीसाठी कुठलेही पथक नसल्यामुळे हजारो प्रवासी विना तपासणीचेच बाहेर पडत असल्याचे 'लोकमत' प्रतिनिधीने केलेल्या पाहणीतून दिसून आले. त्यामुळे मुख्य दादऱ्यावरील तपासणी पथकाचा उपयोग काय, असा प्रश्न प्रवाशांमधून उपस्थित केला जात आहे, तसेच रेल्वे व मनपाच्या या चुकीच्या नियोजनाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

इन्फो :

रेल्वे प्रशासन म्हणते, आरोग्य पथक नियुक्त करण्याची जबाबदारी मनपाची

मुख्य दादऱ्यावर आरोग्य पथक असताना, रेल्वेने एक ते दीड महिन्यांपासून नवीन दादराही प्रवाशांसाठी खुला केला आहे. त्यामुळे अनेक प्रवासी मुख्य दादऱ्यावरून न जाता विना तपासणीच नव्या दादऱ्यावरून बाहेर पडत आहेत. याबाबत `लोकमत`प्रतिनिधीने स्थानिक रेल्वे अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, त्यांनी तत्कालीन डीआरएम विवेककुमार गुप्ता यांच्या सुचनेनुसार दादऱ्याचे काम पूर्ण झाल्यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी हा दादरा खुला केला आहे. तो बंद करता येणार आहे; मात्र या नवीन दादऱ्यावरही आरोग्य पथक नियुक्त करण्याची जबाबदारी मनपाची आहे. तर याबाबत मनपाला पत्र देणार असल्याचे सांगण्यात आले.

इन्फो :

सध्या मनपा आरोग्य विभागातर्फे मुख्य दादऱ्यावर परराज्यातून येणाऱ्या प्रवाशांच्या तपासणीसाठी आरोग्य पथक नियुक्त केले आहे. कर्मचारी संख्या कमी असल्यामुळे, आहे त्या कर्मचाऱ्यांवर ताण आहे; मात्र लवकरच या दादऱ्यावरही पथक नियुक्त केले जाईल.

डॉ. राम रावलानी, मुख्य वैद्यकीय अधिकारी, मनपा.