शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण-नगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
2
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
3
Latest Marathi News LIVE: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
4
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
5
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
6
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
7
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
8
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
9
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
10
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
11
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
12
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
13
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
14
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
15
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
16
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
17
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
18
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
19
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
20
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
Daily Top 2Weekly Top 5

‘कोरोना’ची तपासणी : दुबईहून आलेले दीपनगरचे दोघेही ‘नॉर्मल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2020 13:34 IST

एकही संशयित नाही

जळगाव : दीपनगर येथे दुबई येथून परतलेल्या दोघा पुरूषांची प्रकृती सामान्य असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे़ या दोघांची तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून शुक्रवारी तसा अहवाल जिल्हा शल्यचिकित्सकांकडे सोपविला़ दरम्यान, जिल्ह्यात एकही संशयित रूग्ण नसल्याची माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ़ भास्कर खैरे यांनी दिली आहे़दीपनगर येथील दोन पुरूष हे २८ फेब्रुवारी रोजी दुबई येथून परतले होते़ याबाबत माहिती मिळाल्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ़ एऩ एस़ चव्हाण यांनी तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांना पत्र पाठवून त्यांची तपासणी करण्याचे आदेश गुरूवारी दिले होते़ त्यानंतर डॉ़ बाळासाहेब वाबळे यांनी शुक्रवारी या दोघांची तपासणी केली असता त्यांना कसलीच लक्षणे नसून ते दोघेही सामान्य असल्याचे त्यांनी कळविले आहे़ आरोग्य विभाग या दोघांवर लक्ष ठेवून आहे़स्वतंत्र वार्डसाठी पत्र देणारशासकीय वैद्यकीय महाविद्यालयात असलेला कोरोनासाठीचा स्वतंत्र वार्ड हा अगदीच गजबजलेल्या ठिकाणी असून यात पुरेशा रूग्णांची व्यवस्था नाही, यासाठी डीईआयसीच्या इमारतीत ५० खाटांचा एक स्वतंत्र कक्ष करावा, याबाबत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ़ एऩ एस़ चव्हाण हे अधिष्ठाता डॉ़ भास्कर खैरे यांना पत्र देणार असल्याची माहिती आहे़जि.प. सदस्यांचा केरळ दौरा पुढेकोरोनाच्या पार्श्वभूमीवर अखेर जिल्हा परिषद सदस्य व अधिकाºयांचा केरळ दौरा पुढे ढकलण्यात आला आहे़ २२ मार्च रोजी हा दौरा होता़ दौरा पुढे ढकलण्याबाबत ग्रामपंचायत विभागाला मोबाईलवर सूचना मिळालेल्या आहेत़ दुसरीकडे मात्र, अध्यक्षा व काही सदस्यांच्या कोकण दौºयाबाबत अद्याप निर्णय झाला नसल्याचे कळते़सर्दी, खोकला म्हणजे कोरोना नाहीभुसावळ येथील एका तरूणीला कोरोना संशयावरून जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आल्याचे वृत्त होते़ मात्र, तसा कुठलाही रूग्ण कोरोना वार्डात अद्याप दाखल झाला नसल्याचे रूग्णालय प्रशासनाने स्पष्ट केले असून संशयित रूग्ण कोणाला म्हणायचे? याच्या सूचना आधीच सर्वांना दिल्या असल्याने प्रत्येक सर्दी, खोकल्याचा रूग्ण हा संशयित नाही, असेही प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे़ज्या शहरात आंतरराष्ट्रीय विमानतळ आहेत़ ज्यांचा परदेशाची थेट संपर्क असतो, अशा शहरात हे क्वारंटाईन अर्थात परदेशातून आलेल्यांसाठीचा स्वतंत्र वार्ड आहे़ रूग्णांना विमान तळावरच तपासून मोठ्या शहरात क्वारंटाईनमध्ये ठेवले जाते़ आपल्याकडे आरोग्य यंत्रणा पूर्णत: सज्ज असून हॉटेल्स, ट्रॅव्हल कंपन्या यांना सूचना देण्यात आल्या असून त्यांच्याकडून विदेशात जाणाºया व येणाºयांच्या याद्या मागवून तपासणी करण्यात येत आहे़- डॉ़ भास्कर खैरे, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,

टॅग्स :Jalgaonजळगाव