शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

खानापूरला प्रतिबंधित क्षेत्रांचा बोजवारा उडाल्याने कोरोनाची साखळी आता १२ रुग्णांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2020 17:14 IST

कोरोना बाधितांची साखळी आता १२ वर पोहोचत आहे.

ठळक मुद्देग्रा पं प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे नागरिकांचे आरोग्य व्हेंटीलेटरवरतालुका प्रशासनाची मात्र चुप्पी

किरण चौधरीरावेर : तालुक्यातील खानापूर येथील बसथांबा परिसर व सप्तशृंंगी नगर भागातील सहा कोरोना बाधित रूग्ण सापडल्यानंतर गावातील सप्तशृंंगी नगर, पीक संरक्षण सह सोसायटी परिसर व माळीवाडा परिसरात कोरोनाचे संक्रमण वाढले असून, कोरोना बाधितांची साखळी आता १२ वर पोहोचत आहे.वाघोड आरोग्य केंद्राचे आरोग्य सहाय्यक दिनेश चौधरी यांच्या नेतृत्वाखाली आशावर्कर तथा अंगणवाडी सेविका यांच्या पल्सआॅक्सीमीटरद्वारे केलेल्या सर्व्हेक्षणाअंती सहा संशयित रूग्ण कोरोना बाधित निघाल्याचा गंभीर प्रकार उजेडात आला आहे. ग्रा.पं.प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कोरोना बाघित रुग्णांच्या प्रतिबंधित क्षेत्रांचा बोजवारा उडाल्याने गावातील कोरोना बाधितांची साखळी वाढत चालली आहे. ग्रामस्थांचे आरोग्य व्हेंटीलेटरवर लागल्याची संतप्त टीका ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे.खानापूर गावातील बसथांबा परिसरात असलेल्या एका ५५ वर्षीय महिलेने रावेर शहरातील जिजाऊ नगर भागात घरकामासाठी रोजंदारीने जावून कोरोनाचे लोण गावात आणले. दोघही नात आजी कोरोनामुक्त झाल्या. पण त्यांचा प्रतिबंधित क्षेत्राचा बंदोबस्त ग्रा.पं.ने मंडपाचा केवळ एक आडवा पाईप लावून केला होता. किंबहुना बसथांबा परिसरात ग्रामस्थांचा वाढता वापर असल्याने त्या प्रतिबंधित क्षेत्रातील सुदृढ तब्येत असलेल्या वा कोणतेही लक्षण नसलेल्या एखादया अदृश्य स्वरूपातील कोरोना वाहकाकडून गावात हळूहळू कोरोनाचे संक्रमण पसरत असल्याची शक्यता नाकारता येत नाही. फैजपूर कोव्हीड इंसिडन्ट कमांडंट डॉ अजित थोरबोले यांनी प्रतिबंधित क्षेत्राची नाकाबंदी पाहून ग्रा पं चे ग्रामविकास अधिकारी व्ही के महाजन यांची कानउघाडणी केली होती. मात्र ग्रा पं प्रशासनात कोणत्याही प्रकारची सुधारणा झाल्याचे चित्र नाही.ग्रा.पं.कडून नागरिकांसह आरोग्य यंत्रणे सुविधा न पुरवल्यास स्क्रिनींगच्या सर्व्हेक्षणावर बहिष्कार टाकण्याच्या संतप्त भावना आशावर्कर व अंगणवाडी सेविकांनी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.शिवराय पाटील यांना दिला आहे. किंबहुना, शासनाकडून प्रत्येक प्रतिबंधित क्षेत्रासाठी ग्रा.पं.वा न.पा.सारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांना स्वतंत्र निधी दिला जात असताना संबंधित ग्रा.पं.प्रशासनाकडून नाकाबंदीसह आरोग्य यंत्रणेला सहकार्य केले जात नसेल तर तसा अहवाल वरिष्ठांकडे सादर करणार असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.शिवराय पाटील यांनी स्पष्ट केले.दरम्यान, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.शिवराय पाटील, सरपंच अमिना तडवी, आरोग्य सहाय्यक दिनेश चौधरी, तलाठी बी.एन.वानखेडे, पोलीस पाटील दीपक महाजन, ग्रा.पं.सदस्य मोहन धांडे आदी उपस्थित होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRaverरावेर