शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

गावठाण मोजणीवरुन वाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2019 22:10 IST

पथराळेची घटना : विरोध करणाऱ्यांविरुद्ध ग्रामस्थांची तहसीलदारांकडे धाव

यावल : तालुक्यातील स्थलांतरीत गाव असलेले पथराळे येथील शासनाने संपादन केलेल्या गावठाणाची हद्द शुक्रवारी निश्चित करण्यासाठी आलेल्या भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांशी थोरगव्हाण येथील पाच जणांनी वाद घातला. यामुळे या मोजणीला अडथळा आल्याने शिरागड/ पथराळे गृप ग्रामपंचायतीच्या सरंपचासह पथराळे येथील सुमारे १०० ग्रामस्थांनी यावल येथील पो. नि. रविकांत सोनवणे व तहसीलदार जितेन्द्र कुवर यांना निवेदन सादर केले.तालुक्यातील पथराळे हे गाव सन १९५९ मध्ये तापी नदीच्या पुरामुळे स्थलांतरीत केले आहे. शासनाने संपादन केलेल्या गावठाणावर बेघारांसाठी प्लॉट देण्यासाठी थोरगव्हान/ पथराळे गृप ग्रामपंचायतीच्या वतीने गावठान हद्द निश्चितीसाठी भूमी अभिलेखा कार्यालयाकडे अर्ज केला होता त्याुनसार भुमी अभिलेखा कार्यालयाचे दोन कर्मचारी मोजणीसाठी गावठाणावर आले होते. दरम्यान ग्रामसेवक भरत पाटील यांनी याबाबत नेमके प्रकरण काय आहे यांसाठी तहसीलदार , गटविकास अधिकारी यांचे मार्गदर्शन घेवून पुढील निर्णय ग्रामपंचायत घेईल, असे सांगितले.तर मोजणीस विरोध करणाºयाविरुद्ध निवेदन देण्यासाठी सरंपचा योगीता प्रताप सोनवण, प्रताप सोनवणे, गणेश धिवर, अविनाश धिवर, ईश्श्वर भालेराव, मधुकर सुरवाडे, यांचेसह सुमारे १०० च्या वर ग्रामस्थ येथे आले होते.सदर निवेदनावर अडीचशे ग्रामस्थांच्या सहया आहेत.दरम्यान शासनाने जमीन बेकायदेशीर संपादन केल्याचे चोधरी कुटुंबियांचे म्हणणे असून न्यायालयाचा आमचे बाजुने निकाल लागला आहे. तहसीलदार कार्यालयाकडून फेरफारसाठी आमचे प्रकरण प्रलंबीत असल्याचे सांगीतले.