शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

कमी वेळात अधिक माल विक्रीच्या लगबगीत भाजीपाला नियंत्रणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गेल्या काही दिवसांपासून मोठी भाववाढ असलेल्या खाद्यतेलाचे भाव अजूनही चढेच आहेत. तर इतर किराणा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : गेल्या काही दिवसांपासून मोठी भाववाढ असलेल्या खाद्यतेलाचे भाव अजूनही चढेच आहेत. तर इतर किराणा साहित्याचे भाव मात्र स्थिर आहेत. दुसरीकडे, कोरोना निर्बंधामुळे किराणा, भाजीपाला विक्री यांच्या वेळांवरही निर्बंध आल्याने कमी वेळात अधिक माल विक्री करण्याच्या प्रयत्नात भाजीपाल्याचे दर ऐन उन्हाळ्यात नियंत्रणात आहे.

गेल्या दोन महिन्यांपासून चढ-उतार होत असलेल्या खाद्यतेलामध्ये सलग दोन आठवडे मोठी भाववाढ झाली. ती अजूनही कायम आहे. यात तीन आठवड्यांपूर्वी सोयाबीन तेलात भाववाढ होऊन ते १४० ते १४५ रुपये प्रतिकिलोवर पोहोचले होते. त्यानंतर दोन आठवड्यांपूर्वी त्यात पुन्हा वाढ होऊन सोयाबीन तेलाचे भाव १५० रुपये प्रतिकिलोवर पोहोचले. शेंगदाण्याच्या तेलातही भाववाढ होऊन ते १८० ते १९० रुपये प्रतिकिलोवर पोहोचले. तसेच सूर्यफूल तेलाच्याही भावात वाढ होऊन ते १७५ ते १८० रुपये प्रतिकिलोवर पोहोचले. खाद्यतेलातील ही भाववाढ अजूनही कायम आहे.

इतर वस्तू स्थिर

दोन आठवड्यांपूर्वी डाळींचे भावदेखील वाढले व हरभरा डाळीच्या भाववाढीने बेसनपीठदेखील वधारून ते ८० ते ९० रुपये प्रतिकिलोवर पोहोचले. हे भावदेखील कायम आहे. मात्र साखर ३६ रुपये प्रतिकिलोवर स्थिर असून रवा ३५ ते ४० रुपये तर मैदा ३५ ते ३८ रुपये प्रतिकिलोवर व इतरही किराणा मालाचे भाव स्थिर आहे.

टोमॅटो १० रुपयांवर

सध्या उन्हाळा सुरू झाला असला तरी भाजीपाल्याचे भाव अजूनही स्थिर आहेत. कोथिंबीर ४० रुपये किलो तर मेथीही ४५ रुपये किलोवर आहे. टोमॅटोचे भाव तर कमी होऊन १० रुपये प्रतिकिलोवर आले आहेत.

लसूण खातोय भाव

गेल्या काही दिवसांपासून बटाट्याचे भाव कमी होऊन ते २० रुपये प्रतिकिलोवर आहेत. यासोबतच कांद्याचे भावदेखील कमी होऊन ते २० रुपये प्रतिकिलोवर आले आहेत. मात्र, कोरोनामुळे लसूण, लिंबू यांना मागणी वाढल्याने त्यांचे भाव वाढत आहेत. लसूण १०० ते १४० रुपये तर लिंबू ६० रुपये प्रतिकिलोवर पोहोचले आहे.

खाद्यतेलाचे भाव कमी होत नसल्याने आर्थिक भार कायम आहे. भाजीपाल्याचे भाव स्थिर असल्याने दिलासा आहे.

- दिलीप सोनवणे, ग्राहक

खाद्यतेलाच्या भाव वाढलेलेच असून इतर किराणा साहित्याचे भाव स्थिर आहेत. सध्या निर्बंधामुळे मागणी वाढली असली तरी भाव स्थिर आहे.

- सचिन छाजेड, व्यापारी

सध्या भाजीपाल्याची आवक चांगली असल्याने त्यांचे भाव स्थिर आहेत. लिंबू, लसूण यांच्या भावात काहीसी वाढ आहे.

- रमेश वाणी, भाजीपाला विक्रेते