शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सागरपार्कवर मनपाचाच ताबा

By admin | Updated: February 4, 2017 00:49 IST

सर्वोच्च न्यायालय : लुंकड परिवाराची याचिका फेटाळली

जळगाव : सागरपार्कच्या जागेवर महापालिकेचाच ताबा असल्याचा निर्वाळा देत सर्वोच्च न्यायालयाने याप्रश्नी लुंकड परिवाराने केलेली याचिका शुक्रवारी फेटाळली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या न्या. मदन लोकुर व न्या. प्रफुल्ल सी.पंत यांच्या पुढे याप्रश्नी कामकाज झाले, अशी माहिती महापौर नितीन लढ्ढा यांनी दिली. शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या स्व. नथमल लुंकड यांच्या मालकीची सागरपार्कची जागा होती. या जागेवर तत्कालीन पालिकेने वाचनालय, सुतिकागृह व उद्यान असे आरक्षण करून जागा संपादीत केली होती. त्यावेळी लुंकड परिवाराने पालिकेने ठरविलेल्या कारणासाठी जागेच्या संपादनास त्यावेळी सहमतीही दर्शविली होती. मात्र नंतर पालिकेने निर्धारीत वेळेत जागेचे संपादन केले नव्हते. त्यामुळे ही जागा पुन्हा ताब्यात मिळावी यासाठी लुंकड परिवाराने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. मात्र पालिकेने नगरविकास योजनेत (टी.पी.स्किम) मध्ये जागा संपादीत केल्याचे सांगून संबंधीतांना मोबदलाही देऊ केला होता. त्यामुळे न्यायालयाने लुंकड परिवाराने जागा ताब्यात मिळावी म्हणून केलेला दावाही नाकारला होता. उच्च न्यायालयाकडून जागेचा ताबा मिळत नसल्याने  लुंकड परिवाराने याप्रश्नी सर्वोच्च न्यायालयाकडे धाव घेत याचिका (स्पे. लिव्ह पिटीशन) दाखल केली होती. याप्रश्नी सर्वोच्च न्यालयात याप्रश्नी मनपा तसेच लुंकड परिवाराकडून युक्तीवाद झाला. न्या. मदन लोकुर, न्या. प्रफुल्ल सी. पंत यांच द्विसदस्य बेंचपुढे हा युक्तीवाद झाला. न्यायालयात मनपातर्फे अॅड. शिवाजी जाधव, अॅड. हिरेन रावल तर लुंकड परिवारातर्फे अॅड. मनोहर नाफडे, अॅड. अभय मनोहर, अॅड. चेला स्वामी यांनी काम पाहीले. न्यायालयाने दोन्ही बाजुंचा युक्तीवाद ऐकून मनपाची बाजुने निकाल देत सागर पार्कच्या जागेवर मनपाचा हक्क कायम ठेवला व लुंकड परिवाराची याचिका फेटाळली.