शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

मुक्ताईनगरात मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2018 01:55 IST

मुक्ताईनगर शहरात मोकाट व जखमी कुत्र्यांचा मुक्त संचार वाढल्याने नागरिक हैराण झाले होते. अखेर नगरपंचायतीने कुत्रे पकडण्याचे आदेश देऊन दिलासा दिला आहे. सोमवारी पहिल्याच दिवशी २२ कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात आला. दरम्यान, अधिक उपाय योजना म्हणून मोकाट कुत्रे पकडण्यासाठी नगरपंचायतीने निविदा काढली आहे

ठळक मुद्देमोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी नगरपंचायतने काढली निविदापहिल्याच दिवशी २२ कुत्र्यांना पकडले

मुक्ताईनगर : शहरात गेल्या काही दिवसांपासून मोकाट व जखमी कुत्र्यांचा मुक्त संचार वाढल्याने नागरिक हैराण झाले होते. धसका घेतलेल्या नागरिकांना अखेर नगरपंचायतीने कुत्रे पकडण्याचे आदेश देऊन दिलासा दिला आहे. सोमवारी पहिल्याच दिवशी २२ कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात आला. दरम्यान, अधिक उपाय योजना म्हणून मोकाट कुत्रे पकडण्यासाठी नगरपंचायतीने निविदा काढली आहेशहरात मोकाट कुत्र्यांचा मुक्त संचार वाढला होता. ठिकठिकाणी भटकी कुत्री धुमाकूळ घालत असल्याने त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी सातत्याने होत आहे. अगोदरच भटके कुत्रे धुमाकूळ घालत असतांना त्यात भर म्हणून काही अज्ञातांनी बाहेरच्या कुत्र्यांना गावात आणून सोडल्याने ही कुत्री एकमेकांवर भुंकतात व हल्ला करत असतात. यातील काही कुत्रे पिसाळलेले असल्याने तसेच अनेक कुत्र्यांना खरुज व खोलवर जखमा झाल्या आहेत. त्यामुळे हे कुत्रे बेभान होत नागरीकांना त्यांचा त्रास होण्याचा धोका प्रचंड प्रमाणात निर्माण झाला आहे.याबाबत शिवसेना महीला आघाडीच्या उपजिल्हा संघटक सुषमा बोदडे - शिरसाठ यांच्या नेतृत्वाखाली पालिकेला निवेदन देत कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली होती. यावर कारवाई झाली नसल्याने महिला आघाडीतर्फे पुन्हा स्मरण पत्र देऊन आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता.गेल्या चार ते पाच दिवसात अनेकांना बाधीत कुत्र्यांनी दंश केल्याच्या घटना घडल्या आहेत. तर कुत्रे अंगावर आल्याने काही दुचाकी वाहनांचे किरकोळ अपघाताच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे नगरपंचायत प्रशासन खाडकन जागे झाले व संबंधित सफाई कर्मचाऱ्यांच्या मुकादमांना मोकाट कुत्र्यांचा व डुकरांचा बंदोबस्त करण्याचे आदेश दिलेत.दरम्यान, १७ रोजी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी शाम गोसावी यांच्या आदेशाने आरोग्य विभाग कार्यालयीन अधिक्षकांनी सफाई कर्मचाº्यांचे मुकादम अनिल तायडे व गणेश कोळी यांना लेखी आदेश देत कुत्र्यांचा व डुकरांचा बंदोबस्त करण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार कर्मचारी राजा हंसकर, कालीचरण तेजी, साजन फतरोड, गोपाल लोहरे, सागर चिरावंडे, मनोज ढेंडवाल अशा सफाई कर्मचाºयांचा समावेश असलेले पथक तयार केले गेले आणि सदर कर्मचाºयांनी एकाच दिवसात २२ कुत्र्यांना पकडले. त्यापैकी खोलवर जखमा झालेल्या काही कुत्र्यांना प्राथमिक उपचार करण्यात आले. व सर्व कुत्र्यांना बाहेर जंगलात सोडण्यात येणार आहे.दरम्यान, अधिकच्या उपाय योजना म्हणून नगर पंचायतीने शहरातील मोकाट कुत्रे पकडण्याबाबत निविदा काढली आहे. ३० डिसेंबर ही निविदेची मुदत आहे. 

टॅग्स :dogकुत्रा