शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

भुसावळात लोकवर्गणीतून विंधन विहिरीची उभारणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 22:54 IST

भुसावळ शहरासह परिसरातील पाणी प्रश्न अत्यंत गंभीर झाला आहे. त्यामुळे पापानगरातील मुस्लीम समाज बांधवांनी लोकवर्गणीतून विंधन विहीर (बोरिंग) तयार करून पाण्याची सोय केली, तर गौसियानगरात युवकांनी बंद पडलेले हातपंप (हापसी) लोकवर्गणीतून दुरुस्ती करून पाण्याचा प्रश्न मिटविण्याचा प्रयत्न केला.

ठळक मुद्देभुसावळातील पाणी प्रश्न गंभीरबुजलेली विहीर २२ फूट खोदलीबंद विंधन विहिरी सुरू करण्यावर भरनगरसेवकांकडून ठराविक भागात पाणीपुरवठा

भुसावळ : शहरासह परिसरातील पाणी प्रश्न अत्यंत गंभीर झाला आहे. त्यामुळे पापानगरातील मुस्लीम समाज बांधवांनी लोकवर्गणीतून विंधन विहीर (बोरिंग) तयार करून पाण्याची सोय केली, तर गौसियानगरात युवकांनी बंद पडलेले हातपंप (हापसी) लोकवर्गणीतून दुरुस्ती करून पाण्याचा प्रश्न मिटविण्याचा प्रयत्न केला.दरम्यान, याच भागात बंद पडलेली (बुजलेली) विहीर युवकांनी पुढाकार घेऊन खोदण्यास सुरुवात केली आहे. शासनाकडून केवळ घोषणाबाजी होत आहे. प्रत्यक्षात कोणतीही मदत मिळत नसल्याची या भागातील रहिवाशांची ओरड आहे.शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तापी नदी पात्राने तळ गाठला आहे. त्यामुळे पाणीप्रश्न अत्यंत गंभीर झाला आहे. शहरांत बारा ते पंधरा दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. घोटभर पाण्यासाठी लोकांवर वणवण भटकण्याची वेळ आली आहे.पापानगर भागामध्ये पाणी प्रश्न अत्यंत गंभीर झाल्यामुळे शासन दरबारी अनेक वेळा पाण्यासाठी नियोजन करण्याची मागणी केली गेली. मात्र दरवेळी करू, बघू, पाहू अशी उत्तरे मिळाली. प्रत्यक्षात कृती मात्र शून्य झाली.मत्शिदीचे मौलाना आले पुढेपाण्यासाठी आता स्वत: पुढाकार घेऊन काहीतरी नियोजन करावे लागेल या उद्देशातून पापानगर मशीदचे हजरत इरफान मौलाना व समाज बांधवांनी लोकवर्गणी करून पापानगरात बोरिंग केली. या भागाला या माध्यमातून सकाळी दोन व संध्याकाळी दोन तास पाणीपुरवठा करण्यात येत आहे.गौसियानगर भागांमध्येही पाण्याचा प्रश्न अत्यंत बिकट झाला आहे. या ठिकाणी युवकांनी पालिकेची बंद पडलेल्या हातपंपाची तांत्रिकदृष्ट्या आलेली अडचण लोकवर्गणीतून दूर करून येथील भागातील परिसरातील नागरिकांसाठी पाण्याची व्यवस्था केली. शिवाय याच भागाच्या दुसºया टोकावरही अशाच पद्धतीने शेख मुख्तार शेख गफूर, शेख मुस्तफा मोहम्मद हरून खाटीक, रोशन इब्राहिम पिंजारी, कलीम अय्युब खान, अजिज शेख उस्मान, आबीद पिंजारी सरदार चव्हाण, शेख भुºया सद्दाम, आबीद याकूब पिंजारी या युवकांनी पुढाकार घेऊन दुसºया टोकावरचा बंद पडलेला हातपंप सुरू केला. यामुळे या भागातील नागरिकांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे.बुजलेली विहीर खोदली९ वर्षापूर्वी बुजलेली विहीर या युवकांनी सकाळी व संध्याकाळी दोन सत्रामध्ये स्वत: उत्खनन करण्याचे काम हाती घेतले आहे. आतापर्यंत या युवकांनी २३ फूट खोल विहिरीचे उत्खनन केले आहे. या भागातील वृद्ध, दिव्यांग महिला घोटभर पाण्यासाठी वणवण भटकत असतात.वेळेप्रसंगी पाण्यासाठी भांडणतंटेही होतात. शासन दरबारी वेळोवेळी पाठपुरावा करून सुद्धा काही उपयोग होत नसल्यामुळे स्वत: युवकांनी पुढाकार घेतला आहे. नागरिकांचे होणारे हाल विशेषता वृद्धांचे व महिलांचे हाल पाहिले जात नाही अशी वेदना नागरिकांच्या डोळ्यातून स्पष्ट दिसत असल्याचे चित्र आहे.दरम्यान, ठराविक नगरसेवक पाहिजे त्या प्रभागात टँकरद्वारे पाणीपुरवठा करत आहेत. ‘जिसकी लाठी उसकी भैस’ असा प्रत्यय शहरवासीयांना येत आहे तर खासगी टँकरवाले अव्वाच्या सव्वा भावाने पाण्याच्या टँकरचा दर आकारत असल्याची स्थिती आहे.पाण्यासारख्या गंभीर प्रश्नावर मात करण्यासाठी गेल्या दीड वर्षापासून बंद पडलेली मशिदीच्या मालकीची बोर दुरुस्तीसाठी समाजबांधवांना आवाहन करण्यात आले. सर्वांच्या सहकार्यातून अखेर बोर दुरुस्त करण्यात आली.-मोहमद इरफान राजा खान कादरी, मौलाना, पापानगर मशीद, भुसावळ.पालिका प्रशासनाकडून नवीन विंधन विहिरींसाठी ठराव मंजूर झालेले आहेत. जुन्या विहिरीतील ही गाळ काढून उपसा करण्यात येईल व त्याद्वारे नागरिकांची पाण्याची समस्या सोडविण्यात येईल. सध्या ज्या भागांमध्ये पाण्याची आवश्यकता आहे त्या ठिकाणी टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.-महेंद्रसिंग ठाकूर, पाणीपुरवठा समिती सभापती, भुसावळ नगरपालिका.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईBhusawalभुसावळ