शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

दिलासा..विमानाने मुंबईला जाणाऱ्यांची "आरटीपीसीआर" होणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जळगावसह राज्यातील इतर कुठल्याही विमान तळावरून मुंबई विमानतळावर जाणाऱ्या-येणाऱ्या प्रवाशांची करण्यात येणारी आरटीपीसीआर चाचणी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जळगावसह राज्यातील इतर कुठल्याही विमान तळावरून मुंबई विमानतळावर जाणाऱ्या-येणाऱ्या प्रवाशांची करण्यात येणारी आरटीपीसीआर चाचणी १ जून पासून बंद करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. या निर्णयामुळे प्रवाशांना मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळाला आहे. मात्र, जळगाव विमान तळावरून सध्या मुंबईची आठवड्यातून दोनच दिवस सेवा सुरू असल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमान तळावरील अनेक उड्डाणानां निर्बंध घातले होते. यामध्ये जळगाव ते मुंबई विमान सेवा पुरविणाऱ्या कंपनीचाही समावेश होता. तर मुंबई महापालिका प्रशासनाने राज्यासह देशभरातून कुठूनही विमानाने मुंबई येणाऱ्या- जाणाऱ्या प्रवाशांसाठी 'आरटीपीसीआर' चाचणी बंधनकारक केली होती. मुंबई विमानतळावर विमानाने प्रवास करणाऱ्या प्रत्येकाची कोरोना चाचणी करण्यात येत असल्यामुळे भीती पोटी अनेकजण विमान प्रवास टाळत होते. यामुळे याचा विमानाच्या प्रवाशी संख्येवरही मोठा परिणाम झाला होता.

मात्र,राज्य शासनाने १ जून पासून लॉकडाऊन मधून काहीशी शिथिलता उठविल्याने, मुंबई मनपा प्रशासनानेही विमान तळावरील आरटीपीसीआर चाचणीचा निर्णय मागे घेतला आहे. या निर्णयाचे प्रवाशांमधून स्वागत करण्यात येत आहे. दरम्यान, जळगावला विमान सेवा देणाऱ्या कंपनीचे व्यवस्थापक अखिलेश सिंग यांनी मुंबई मनपाच्या निर्णयानुसार आमच्या कुठल्याही प्रवाशांची मुंबई अथवा जळगाव विमान तळावरही आरटीपीसीआर चाचणी केली जाणार नसल्याचे सांगितले. मात्र, ज्या नागरिकांना कोरोना सदृश लक्षणे आढळून येतील, त्यांनी स्वतःहून विमान प्रवास टाळण्याचे आवाहनही अखिलेश सिंग यांनी केले आहे.

इन्फो :

लवकरच आठवड्यातून तीन दिवस सेवा

सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या सूचनेनुसार जळगावहून मुंबईसाठी आठवड्यातून दर बुधवारी व रविवारी मुंबईची सेवा सुरू आहे. तर आता लॉकडाऊन मध्ये काहीशी शिथिलता उठविल्यानंतर आणखी एक दिवस मुंबईची सेवा वाढणार आहे. तर शक्य झाल्यास शनिवारीही मुंबईची विमान सेवा राहणार असल्याचे अखिलेश सिंग यांनी सांगितले. दरम्यान, मुंबईची विमानसेवा नियमित झाल्यावर प्रवाशांचाही प्रतिसाद वाढणार असल्याचे बोलले जात आहे.