शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

भूगोल दिनाला अध्यात्म्याची जोड, ‘उपेक्षित’ भूगोलात आता करियरच्याही संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2020 12:39 IST

सर्व शास्त्रे एकवटतात पायथ्याशी

चुडामण बोरसे जळगाव : सर्वव्यापी आणि सर्व समावेशक असूनही पदरी उपेक्षा घेऊन बदलत्या प्रवाहात आता ‘भूगोल’ही कात टाकीत आहे. भुगोलाची व्याप्ती वाढण्यास सुरुवात झाली आहे. यातील संबंधित विषय आता करियरच्या द्दष्टीने महत्वाचे ठरत आहेत आणि त्याकडे विद्यार्थ्यांचा ओढाही वाढला आहे.भूगोलाला सर्व शास्त्रांची माता असेही म्हटले जाते. २२ डिसेंबर रोजी उत्तर गोलार्धात सर्वात मोठी रात्र असते. त्या दिवसापासून दिवसाचा कालावधी थोडा- थोडा वाढत जातो. १४ जानेवारी रोजी सूर्य कर्कराशीत संक्रमण करतो. आपल्या संस्कृतीनुसार उत्तरायण सुरु होते. भूगोल दिनाला अशी अध्यात्मिक किनारही लाभली आहे.पृथ्वीवरील भूभाग, नद्या, समुद्र, वनस्पती, भोवतालचे वातावरण यांचा परस्परांवर आणि या सर्व घटकांतील बदलांचा सृष्टीवर होणारा परिणाम म्हणजेच भूगोल होय. भूगोल हा सर्वशास्त्रांसाठी उपयुक्त असा आहे. समुद्र शास्त्र, खगोल, हवामान, खनिज, वनस्पती आणि प्राणी यांचा अभ्यास यात होत असतो.भूगोलात अशा आहेत करिअरच्या संधीसर्व्हेअर, ड्राफ्टर, केंद्र किंवा राज्य सरकारच्या भूनियोजन, भूमापन, भूजलविकास, गुन्हेअन्वेषण, दूर संवेदन (रिमोट सेिन्सग) विभाग, शहर तसेच क्षेत्रीय विकासक, जीआयएस स्पेशालिस्ट (जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टीम), हवामान विभाग, वाहतूक व्यवस्थापक, पर्यावरणीय व्यवस्थापक, शहर नियोजक तसेच डेमोग्राफर ( जनगणना कार्यालय) अशा ठिकाणी कामांची संधी मिळू शकते.मकरसंक्रांतीला तिळगूळ वाटला जातो. ऋतुबदल होण्याचा हा दिवस भूगोलात महत्त्वाचा आहे. म्हणून याच दिवशी भूगोल दिन साजरा केला जातो. भूगोल तज्ज्ञ प्रा. सी. डी. देशपांडे यांचा अमृतमहोत्सवी सत्कार १९८६ मध्ये पुणे येथे पं. भीमसेन जोशी यांच्याहस्ते झाला होता. तेव्हापासून मकरसंक्रांतीच्या दिवशी डॉ. देशपांडे यांचा जन्मदिन भूगोल दिन म्हणून साजरा केला जातो.भूगोल कडे करियर म्हणून पाहिले पाहिजे. आता तर वैद्यकीय भूगोल ही संकल्पनाही पुढे येत आहे. भविष्यकाळात भूगोलात अनेक बदल होतील, त्यासाठी आपण तयार रहायला हवे.- प्रा.एच.बी.पाटील,नूतन मराठा महाविद्यालय, जळगाव.भूगोल हा सामाजिक विषय असल्याने त्याची उपयुक्तता वाढत आहे. आमच्या महाविद्यालयाने यासाठी नवीन असा प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू केला आहे. विद्यार्थ्यांसाठी जीआयएस आणि त्याच्या सॉफ्टवेअरचा मूलभूत अभ्यासक्रमाचाही यात आहे.- प्रा. डॉ. एस.एन. भारंबे, मू.जे. महाविद्यालय, जळगाव.

टॅग्स :Jalgaonजळगाव