शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

धुळ्य़ात डीपीडीसी निवडणुकीत कॉँग्रेस, राष्ट्रवादीचे वर्चस्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 13:39 IST

विजयी उमेदवारांचा जल्लोष : शिरपूरचे कॉँग्रेसचे दोन्ही उमेदवार पराभूत

ठळक मुद्देनगरपंचायत गटाची जागा राष्ट्रवादीने जिंकली एक जागा बिनविरोध लहान नागरी गटाच्या दोन जागा भाजपाने जिंकल्या 

ऑनलाईन लोकमत

धुळे, दि. 28 - जिल्हा नियोजन समितीच्या नऊ जागांसाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीत कॉँग्रेसने 4 तर राष्ट्रवादी कॉँग्रेस पार्टीने 2 जागा प्राप्त करत आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. तर लहान नागरी गटात भाजपाने 2 जागा जिंकल्या असून शिरपुरातील कॉँग्रेसचे उमेदवार प्रभाकर चव्हाण आणि छाया ईशी हे दोघी पराभूत झालेत. विजयी उमेदवारांनी निकाल जाहीर झाल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात जल्लोष केला. 2011 च्या लोकसंख्येच्या निकषानुसार वाढीव 8 जागा, तर दोंडाईचा मतदार संघातून रिक्त झालेली 1 अशा 9 जागांसाठी डीपीडीसीची निवडणूक बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील तीन केंद्रावर घेण्यात आली होती. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात गुरुवारी सकाळी मतमोजणी झाली. सुरुवातीला ग्रामीण मतदार संघाची मतमोजणी झाली. त्यानंतर लहान नागरी मतदार संघ व नगरपंचायत मतदार संघाची मतमोजणी झाली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा पुरवठा अधिकारी  दत्तात्रय बोरूडे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी शुभांगी भारदे, जिल्हा नियोजन अधिकारी मुरलीधर वाडेकर, उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे आदी अधिका:यांच्या उपस्थितीत मतमोजणी करण्यात आली. ग्रामीण मतदार संघात कॉँग्रेसचा वरचष्मा ग्रामीण मतदार संघाच्या नामाप्र स्त्री प्रवर्गातून  निवडणूक लढविणा:या कॉँग्रेसच्या उमेदवार ललिता सुरेश देसले (पाटण, ता. शिंदखेडा) या विजयी झाल्या. त्यांना 38 मते मिळाली. त्यांनी उषाबाई हरि ठाकरे (निजामपूर, ता. साक्री) यांचा पराभव केला. ग्रामीण मतदार संघाच्या अनुसूचित जमाती स्त्री प्रवर्गात दोन जागांसाठी तीन उमेदवार रिंगणात होते. त्यात कॉँग्रेसच्या नलिनी अशोक गायकवाड (सांगवी, ता. शिरपूर) यांनी 23 मते व राष्ट्रवादी कॉँग्रेस पार्टीच्या खटाबाई धनराज भिल (वार-कुंडाणे) यांनी 19 मते मिळवून विजय मिळविला. या मतदार संघात गुंताबाई श्रावण सोनवणे (पिंप्राड, ता. शिंदखेडा) या पराभूत झाल्या. त्यांना केवळ 9 मते मिळाली. ग्रामीण मतदार संघाच्या अनुसूचित जमाती प्रवर्गातून कॉँग्रेसचे राजू नाना मालचे (फागणे, ता. धुळे) हे  विजयी झाले आहेत. त्यांना 39 मते मिळाली. त्यांनी श्यामलाल सीताराम भिल (सोनगीर) यांचा पराभव केला. श्यामलाल यांना 12 मते मिळाली.  ग्रामीण मतदार संघाच्या सर्वसाधारण प्रवर्गात कॉँग्रेसचे उत्तमराव नारायण देसले हे 43 मते मिळवत विजयी झाले. तर उत्तमराव यांनी चंद्रकांत युवराज पाटील यांचा पराभव केला. त्यांना 10 मते मिळाली. 

लहान नागरी गटाच्या सर्वसाधारण प्रवर्गात भाजपाचे मोहनसिंग हुलेसिंग पाटील यांनी कॉँग्रेसचे प्रभाकर चव्हाण यांचा पराभव केला. मोहन पाटील यांना 32 तर प्रभाकर चव्हाण यांना 24 मते मिळाली. तर याच गटातील नामाप्र स्त्री प्रवर्गात भाजपाच्या वैशाली महाजन यांनी कॉँग्रेसच्या छाया ईशी यांचा पराभव केला. वैशाली महाजन यांना 32 तर छाया ईशी यांना 24 मते मिळाली. 

नगरपंचायत गटातील सर्वसाधारण प्रवर्गात राष्ट्रवादी कॉँग्रेस पार्टीचे शरद निंबाजी भामरे (साक्री) विजयी झाले. त्यांना 20 मते मिळाली. भामरे यांनी निर्मला युवराज माळी यांचा पराभव केला. निर्मला माळी यांना 13 मते मिळाली. 

दरम्यान, यापूर्वी मोठय़ा नागरी मतदार संघातून (महापालिका क्षेत्र) अनुसूचित जाती प्रवर्गाच्या राखीव जागेसाठी राष्ट्रवादी कॉँग्रेस पार्टीचे नगरसेवक जितेंद्र शिरसाठ यांचा एकच अर्ज आल्याने ही जागा बिनविरोध झाली आहे. तशी घोषणा जिल्हा नियोजन विभागातर्फे करण्यात आली आहे.