शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

पाचोरा येथे कृषी विभागातर्फे ‘रानभाजी महोत्सव’ची सांगता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:23 IST

कृषी विभागामार्फत ‘रानभाजी महोत्सव सप्ताह’ दि. ९ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट यादरम्यान साजरा करण्यात आला. या सप्ताहाचा ...

कृषी विभागामार्फत ‘रानभाजी महोत्सव सप्ताह’ दि. ९ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट यादरम्यान साजरा करण्यात आला. या सप्ताहाचा सांगता समारोप कार्यक्रम संपन्न झाला.

पाचोरा तालुका कृषी कार्यालयामार्फत पाचोरा कृषी कार्यालयाचे आवारात या सप्ताहाचे करण्यात आले होते. यावेळी आमदार किशोर पाटील, प्रांताधिकारी डॉ. विक्रम बांदल, तहसीलदार कैलास चावडे, नगराध्यक्ष संजय गोहिल यांचे उपस्थितीत या सप्ताहाचा समारोप करण्यात आला. ‘विकेल ते पिकेल’ स्टॉलचेही उद्घाटन करण्यात आले. कृषी यांत्रिकीकरणअंतर्गत विविध योजनेअंतर्गत खरेदी करण्यात आलेल्या कृषी अवजारे व ट्रॅक्टरचे तसेच विविध यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत सोडत पद्धतीने निवड झालेल्या लाभार्थ्यांना निवड पत्रांचे वितरण उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

संयुक्त राष्ट्र महासंघामार्फत ९ ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिवसाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासन, कृषी विभाग यांनी आदिवासींच्या जीवनात रानभाज्यांच्या संवर्धन व विक्रीतून समृद्धी आणण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. उपविभागीय कृषी अधिकारी नाईनवाड यांनी या कार्यक्रमात मोलाची माहिती दिली.

रानभाज्यांची ओळख, त्यांचे आहारातील महत्त्व, त्यांचे औषधी गुणधर्म, त्यांची पाककृतीबाबत प्रदर्शन करण्यात आले होते. तसेच यावेळी रानभाज्यांच्या संवर्धनातून आदिवासींची समृद्धी, रानभाज्यांची ओळख, रानभाज्यांचे औषधी गुणधर्म व पाककृती, त्यांचे आहारातील महत्त्व याविषयी मार्गदर्शनही करण्यात आले. याप्रसंगी सूत्रसंचालन कृषी पर्यवेक्षक के. एफ. पाटील यांनी केले.

कृषी सहाय्यक विद्यापन पाटील यांनी आपल्या कवितेतून शेतकऱ्यांच्या व्यथा उपस्थितांसमोर मांडल्या. प्रास्ताविक तालुका कृषी अधिकारी बी. बी. गोरडे यांनी केले. प्रमुख मार्गदर्शन किशोर पाटील यांनी उपस्थित शेतकऱ्यांना केले. आभार मंडळ कृषी अधिकारी ए. व्ही. जाधव यांनी मानले. या कार्यक्रमात शेतकऱ्यांनी रानभाज्यांची ओळख करून जास्तीत जास्त रानभाज्यांचा आहारात समावेश करावा, याबाबत कृषी विभागामार्फत आवाहन करण्यात आले.