शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

दोन कुटुंबांसाठी एका शौचालयाची संकल्पना

By admin | Updated: January 25, 2017 00:44 IST

वरणगाव पालिका प्रशासनाकडून काम सुरू : मागणी वाढल्याने प्रशासन अडचणीत

वरणगाव : शहराला हगणदरीमुक्त करण्यासाठी नगरपालिका प्रशासनाला  शहरवासीयांकडून  उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मंजूर अनुदानित शौचालयापेक्षा शहरवासीयांकडून मागणी अर्ज जास्त प्रमाणात दाखल झाल्याने नगरपालिका प्रशासनापुढे अडचणी वाढल्या आहेत. दरम्यान दोन कुटुंब मिळून एक शौचालय या संकल्पनेवर पालिका काम करीत आहे.शासनाच्या स्वच्छ महाराष्ट्र अभियानातंर्गत शहराला हगणदरीमुक्त करण्यासाठी नगरपालिकेने शुभारंभ केला आहे. तीन टप्प्यात शहर स्वच्छ करण्याचा प्रयत्न नगरपालिकेकडून करण्यात येत आहे. शहरात 1 हजार 800 कुटुंबाकडे शौचालय नसल्याचे सव्रेक्षणात आढळून आले आहे. त्यापैकी 600 कुटुंबांना पहिल्या टप्प्यात 600 व्यक्तिगत शौचालय मंजूर करण्यात आले आहेत.त्यापैकी शेकडो शौचालय उभारणीच्या अंतिम टप्प्यात आहेत. जनजागृतीचा प्रभाव नगरपालिकेने स्वच्छ अभियान राबविताना सुरुवातीस कर्मचारी व आशा स्वयंसेवी महिलांकडून शहरवासीयांमध्ये जनजागृती करून स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यात आले आहे. शहरवासीयांनीही  त्यांना प्रतिसाद देत शौचालय उभारणीसाठी पुढाकार घेतला आहे. शासनाने मंजूर केलेल्या अनुदानित शौचालयापैकी शौचालयाची मागणी करणा:यांची संख्या अधिक असल्याने शिवाय जागेअभावी शौचालय उभारणीस अडचण आल्याने त्यावर नगरपालिका प्रशासनाने दोन कुटुंब मिळून एक शौचालय ही संकल्पना नागरिकांसमोर मांडून त्यावरही कामकाज करण्यात येत आहे. गुडमॉर्निग पथकाचा फंडा नैसर्गिक विधीस उघडय़ावर बसणा:या नागरिकांना जागेवर स्वच्छतेची माहिती पटवून देत तेथेच त्या कुटुंबाचा शौचालय अनुदानीत मागणी अर्ज भरून घेतला जात आहे. त्यानंतर त्या कुटुंबाकडील जागेची पाहणी करताच मंजुरी देण्यात येत असल्याने नगरपालिकेला प्राप्त अनुदानित शौचालयापेक्षा व्यक्तिगत शौचालयाची मागणी वाढली आहे. यावर उपाय म्हणून 14 व्या वित्त आयोगाचा निधी तात्पुरत्या स्वरुपात अनुदान वाटपासाठी करण्यात येइल. पुढील स्वच्छ महाराष्ट्र अभियानातंर्गत शौचालयाचे अनुदान प्राप्त होताच ते अनुदान 14 वित्त आयोगाच्या निधीत जमा करण्यात येईल, अनुदानासाठी स्वच्छ महाराष्ट्र अभियान थांबू देणार नसल्याचे नगर पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.(वार्ताहर) भुसावळ तालुक्यातील सर्वात मोठे आणि नगरपालिकेचे शहर म्हणून वरणगाव शहराची नवीन ओळख निर्माण झाली आहे.शहराच्या मध्यातून आशिया महामार्ग जातो. शिवाय नागपूर-मुंबई रेल्वे मार्गावर वरगाव शहर असल्याने या शहराला महत्त्व आहे.असे हे शहर हगणदारीमुक्त होण्यासाठी पालिका प्रशासनाकडून मोठे प्रय} सुरू झाले आहेत. सिद्धेश्वरनगर हा भाग शहरातील सर्वात मोठा झोपडपट्टीचा भाग आहे.याच ठिकाणी वैयक्तीक आणि सार्वजनिक शौचालयाची गरज भासणार आहे.दरम्यान,शौचालयांची मागणी वाढली आहे.म्हणजे या ठिकाणी लोकांमध्ये हगणदरीमुक्तीबाबत चांगलीच  जागृती झाली आहे.त्यामुळे शहरवासीयांकडून मोठय़ा प्रमाणावर प्रस्ताव आले आहेत.शौचालयांची मागणी: वाढली..4शहरवासीयांनीही  त्यांना प्रतिसाद देत शौचालय उभारणीसाठी पुढाकार घेतला आहे. शासनाने मंजूर केलेल्या अनुदानित शौचालयापैकी शौचालयाची मागणी करणा:यांची संख्या अधिक असल्याने शिवाय जागेअभावी शौचालय उभारणीस अडचण आल्याने त्यावर नगरपालिका प्रशासनाने दोन कुटुंब मिळून एक शौचालय ही संकल्पना नागरिकांसमोर मांडून त्यावरही कामकाज करण्यात येत आहे. शहरवासीयांनी योजनेचा लाभ घ्यावा जेणेकरून शहर हगणदारीमुक्त  लवकर केले जाईल. ज्या कुटुंबांकडे व्यक्तिगत शौचालय आहे. उघडय़ावर शौचास जाणा:यावर कायदेशीर कारवाई केली जात आहे. उघडय़ावर शौचास न जाता सार्वजनिक शौचालायाचा वापर करावा.- प्रशांत सरोदे, मुख्याधिकारी,वरणगाव, नगरपालिका. वरणगाव.