शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

मनपाच्या ‘स्मार्ट अ‍ॅप’वर तक्रारींचा पाऊस

By admin | Updated: May 24, 2017 00:30 IST

३ दिवसात १५८ तक्रारी : ४९८ जणांनी केले अ‍ॅप डाऊनलोड

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : महानगरपालिकेतर्फे नागरिकांच्या समस्यांसाठी ‘स्मार्ट जळगाव अ‍ॅप’ व ‘कॉल सेंटर’ सुरू करण्यात आले असून ही सुविधा सुरू झाल्यापासून अवघ्या तीन दिवसांत विविध विभागांशी संबंधित तब्बल १५८ तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यात सर्वाधिक तक्रारी आरोग्य विभागाशी संबंधित आहेत. तसेच मनपाने केलेल्या आवाहनानुसार नागरिकांना विविध विभागांबाबत तक्रारींसाठी खास तयार केलेले ‘स्मार्ट जळगाव अ‍ॅप’ अवघ्या तीन दिवसात तब्बल ४९८ नागरिकांनी आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करून घेतले आहे.महानगरपालिकेकडून नागरिकांच्या समस्यांसाठी ‘स्मार्ट जळगाव अ‍ॅप’ व ‘कॉल सेंटर’ सुरू करण्यात आले असून या सेवेचा शुभारंभ जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्या हस्ते  २० मे रोजी करण्यात आला.  मोबाईलच्या                एका क्लिकवर तक्रारी करता येणार असल्याने सोय झाली  आहे़ कॉल सेंटरच्या ७९०००५१००० या क्रमांकावर संपर्क साधून नागरिकांना बांधकाम परवानगीसाठी काय करावे, जन्म दाखल्यांसाठी  काय करावे        लागते,  विवाह नोंदणी अशा विविध                            प्रश्नांची माहिती नागरिकांना मिळणार आहे. तसेच सेवा व सुविधांबाबतदेखील काही तक्रारी अ                 सल्यास या कॉल सेंटरवर करता येणार आहेत. मनपाच्या ९० प्रकारच्या तक्रारींसाठी हा नंबर वापरता येणार आहे. तर ‘स्मार्ट जळगाव अ‍ॅप’ हे गुगल प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करता येणार आहे.                   त्याद्वारेही नागरिकांना विविध विभागांशी संबंधित           तक्रारी नोंदविता येणार आहे. तसेच विविध परवानग्या, मंजुºया आदीबाबतची माहिती मिळणार आहे. कॉल सेंटरवरील तक्रार होते रेकॉर्डकॉलसेंटरवरील ७९०००५१००० या क्रमांकावर तक्रार केली असता त्याची तेथील कर्मचाºयांकडून नोंद करून संबंधित विभागाकडे तक्रार पाठविली जातेच. त्यासोबत हा फोन कॉल रेकॉर्डही होतो. त्यामुळे कॉलसेंटरवरील कर्मचाºयांकडून तत्परतेने दखल घेऊन संबंधित विभागाकडे तक्रार पाठविली जात आहेच. शिवाय अधिकाºयांकडूनही तातडीने दखल घेतली जात आहे.अस्वच्छतेच्या तक्रारी जादातीन दिवसांत नागरिकांकडून १५८ तक्रारी कॉलसेंटर व ‘स्मार्ट जळगाव अ‍ॅप’द्वारे दाखल झाल्या. त्यात सर्वाधिक ८९ तक्रारी आरोग्य विभागाशी संबंधित आहेत. तर पाणीपुरवठा विभागाशी संबंधित २२, बांधकाम-२०, विद्युत विभाग- १६, अतिक्रमण विभाग- ५, नगररचना विभाग- ३, मलेरिया विभाग- १, पर्यावरण विभाग -२ अशा तक्रारी दाखल झाल्या आहेत.