मनपा स्थायीची २ रोजी सभा
जळगाव - मनपा स्थायी समितीच्या सभेचे २ रोजी मनपाच्या दुसऱ्या मजल्यावरील सभागृहात आयोजन करण्यात आले आहे. सभेपुढे एकूण ४ विषय मंजुरीसाठी ठेवण्यात आले आहेत. मात्र, या सभेत वॉटरग्रेस, वॉटर मीटरच्या आयत्या वेळेच्या विषयांवर गोंधळ होण्याची शक्यता आहे. यासह राज्य शासनाने स्थगिती दिलेल्या ४२ कोटींच्या कामावर देखील ही सभा गाजण्याची शक्यता आहे.
दाऊदी बोहरा समाज महिला मेळावा
जळगाव- दाऊदी बोहरा समाजाच्या महिला, मुलांचा ‘हुनर का बाजार’ बोहरा मस्जिदमध्ये संपन्न झाला. प्रमुख पाहुण्या म्हणून महापौर भारती सोनवणे होत्या. यावेळी डॉ. सोनाली महाजन, मंगला महाजन, अध्यक्ष आमीलसाब शेख सैफुद्दीन अमरावतीवाला,अध्यक्षा बतुल अमरावतीवाला, मदरसा मुख्याध्यापक शेख अब्दुल कादरभाई, हाफिज अम्मारभाई, जमात सचिव मोईज लेहरी, खजिनदार युसूफ मकरा, दाऐरतुल अकीकच्या सचिव सकिना लेहरी, खजिनदार हाजरा अमरेलीवाला, हेल्थ आणि हुनरच्या खजिनदार सकिना बालासिनोरवाला, उमुर तालेमिया समन्वयक मारिया बदामी, उमुल बनीन आदींसह इतर बोहरा समाज महिला आणि मुले उपस्थित होते.
हुतात्मा दिनी पाळणार मौन
जळगाव - देशाच्या स्वातंत्र्यांसाठी प्रार्णापण केलेल्या हुतात्माच्या स्मरणार्थ आदर व्यक्त करण्यासाठी देशभर ३० जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता दोन मिनिट मौन पाडण्यात येणार आहे. याबाबत मनपा प्रशासनाने देखील सर्व कर्मचाऱ्यांसाठी आदेश पारीत केले असून, सकाळी ११ वाजता सर्व विभागप्रमुखांसोबत सर्वच कार्यालयामधील कर्मचाऱ्यांनी ११ वाजता जागेवर उभे राहून मौन पाडण्याचा सूचना मनपा प्रशासनाने दिल्या आहेत. ११ .०२ वाजता भोंगा वाजल्यानंतर मौन संपणार आहे.