शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

चोपड्यात प्लास्टिक पिशव्यांचा सर्रास वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2019 17:13 IST

दुर्लक्ष : शासनाच्या निर्णयला केराची टोपली

चोपडा : महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण मंत्रालयातर्फे प्लास्टिक बंदीचा निर्णय घेतला असताना चोपडा शहरात आणि तालुक्यात प्लास्टिकचा बेसुमार वापर सुरू आहे. याकडे मात्र पालिकेने व इतर संबंधितांनी दुर्लक्ष करत शासनाच्या निर्णयाला केराची टोपली दाखवलेली आहे.बाजारात सर्रासपणे प्लास्टिकच्या पिशव्या या पालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांसमोर अनेक व्यावसायिक वापरत असताना पाहूनही न पाहिल्यासारखे करीत त्यांच्यावर ते निर्बंध आणत नाहीत. यामुळे शहरात प्लॅस्टीकच्या कचºयात रोजच मोठी भर पडत आहे.प्लास्टिकच्या अशा बेसुमार वापराने होणारे दुष्परिणाम लक्षात घेऊन पर्यावरण मंत्रालयाने महाराष्ट्रात प्लास्टिक बंदीचा निर्णय घेतलेला आहे. ३० सप्टेबर अखेर छोट्या व्यावसायिक व मोठे व्यावसायिकांकडे उपस्थित असलेल्या प्लास्टिकच्या पिशव्यांचा उपयोग करून एक आॅक्टोबर नंतर या प्लास्टिक बंदीच्या आदेशाची कडक अंमलबजावणी महाराष्ट्रात होत असतांना चोपडा शहरात मात्र सर्रास ग्राहकांना छोट्या आणि मोठ्या व्यावसायिकांकडून प्लास्टिकच्या पिशव्या दिल्या जात आहेत .प्लास्टिक वापरावर निर्बंध आणण्यासाठी नगरपालिकेतील कर्मचारी सोयीस्कर दुर्लक्ष करीत असल्याचे जागरूक नागरिकांमधून भावना व्यक्त होत आहेत. शहरातील प्लास्टिक पिशव्या विकणारे होलसेलर (ठोक विक्रेते)आणि छोटे व्यावसायिक े मात्र पालिकेचे मुख्याधिकारी व संबंधित कर्मचारी यांना दिसत नाही का? नगरपालिकेचे मुख्याधिकारी आणि कर्मचारी यांची मानसिकता प्लास्टिक बंदीची नसल्याने शहरात आणि ग्रामीण भागातील मोठ्या खेड्यांवरही सर्रासपणे दुकानदार प्लास्टिकच्या पिशव्या वापरत आहेत.यंदाच्या वर्षात एकही कारवाई नाही१ जानेवारी नंतर चोपडा पालिकेकडून प्लास्टीक पिशव्या वापरणाºया एकही कारवाई झालेली दिसत नाही. अथवा यासाठी कर्मचाऱ्यांचे पथक कार्यान्वीत दिसत नाहीत. यावरून प्लास्टिक बंदीबाबत उदासीनता दिसत आहे.