शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

मानधन मागणाऱ्या भाजपा नगरसेवकांना आयुक्तांनी खडसावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2019 12:37 IST

गाळे कारवाई करु द्या, मानधन देतो: आयुक्तांची भूमिका

ठळक मुद्देआयुक्तांवर गाळे कारवाईसाठी खरोखरच दबाव

जळगाव : मनपाकडे काही महिन्यांपासूनचे थकीत मानधन मिळावे, यासाठी सत्ताधारी भाजपाच्या काही नगरसेवकांनी मनपा आयुक्त चंद्रकांत डांगे यांच्याकडे अक्षरश गयावया करत असल्याचे शुक्रवारी दिसून आले. थकीत मानधनाची मागणी करणाºया नगरसेवकाची मनपा आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी चांगलीच खरडपट्टी काढली. मनपाची आर्थिक परिस्थिती बेताची असताना मानधन दिले जावू शकत नसल्याचे कारण देत आयुक्तांनी संबधित नगरसेवकांचे मानधन नाकारले. तसेच मुदत संपलेल्या मार्केटमधील गाळ्यांवर कारवाई करू द्या मानधन देतो असेही आयुक्तांनी या नगरसेवकांना सुनावले.मनपाची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. त्यामुळे अनेक नगरसेवकांनी शासनाकडून मिळणारे मानधन नाकारले आहे. विद्यमान नगरसेवकांमध्ये अनेक नगरसेवक आहेत की ज्यांनी तब्बल १० वर्षांपासूनचे मानधन मनपाकडून घेतलेले नाही. अशा परिस्थिती पाच महिन्यांपुर्वी निवडून आलेल्या भाजपाच्या काही नगरसेवकांनी आयुक्तांकडे थकीत चार महिन्यांचे मानधन मिळावे अशी मागणी केल्यामुळे आयुक्त संबधित नगरसेवकाला चांगलेच खवळलेले पहायला मिळाले. मानधन हे जरी नगरसेवकांचा अधिकार असला तरी मनपाची आर्थिक परिस्थिीतीचा विचार नगरसेवकांनी करणे गरजेचे आहे. मनपा कर्मचाºयांना दोन-दोन महिन्यांचे वेतन मिळत नाही. काही कर्मचाºयांना अनेक वर्षांपासूनची पेन्शनची रक्कम देण्यात आलेली नाही. अशा परिस्थितीत नगरसेवकांनी आपली मानधनाची रक्कम सध्या तरी काढू नये अशी अपेक्षा प्रशासनाला किंवा नागरिकांना आहे.गाळे कारवाई करु द्या, मानधन देतो- आयुक्तांची भूमिकासंबधित नगरसेवकांना आयुक्तांनी धारेवर धरत, एकीकडे तुमचा पक्ष गाळे कारवाई करू देत नाही. त्यामुळे मनपाला सुमारे १५० कोटी रुपयांपर्यंतचे उत्पन्न मिळत नाहीय. अशा परिस्थितीत थकीत मानधन देणे शक्य नसल्याचे आयुक्तांनी नगरसेवकांना सांगितले. गाळे कारवाई करु द्या, तुमचे मानधन देतो अशी भूमिका आयुक्तांनी नगरसेवकांसमोर मांडली. आयुक्तांनी या शब्दात खडसावल्यानंतर या नगरसेवकांनी दालनातून काढता पाय घेतला.आयुक्तांवर गाळे कारवाईसाठी खरोखरच दबावमनपा आयुक्तांनी भाजपा नगरसेवकांना मानधनाच्या मुद्यावरून खडसावताना तुमची पार्टी गाळे कारवाई करु देत नसल्याचे सांगितल्यामुळे भाजपाकडून आयुक्तांवर गाळे कारवाई न करु देण्याबाबत दबाव आहे का ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. गेल्या महिन्यात आयुक्तांनी गाळेधारकांना थकीत गाळे भाडे भरण्याचा सूचना केल्या होत्या. तसेच भाडे न भरल्यास कारवाईचा इशारा दिला होता. मात्र, गाळेधारकांनी आयुक्तांच्या सूचना धुडकावून लावत थकीत रक्कम भरली नाही.आयुक्तांच्या सूचना धुडकावणाºया गाळेधारकांना मोठ्या प्रमाणात राजकीय पाठबळ असल्यामुळेच गाळेधारक आयुक्तांच्या आदेशाला गंभीरतेने घेत नसल्याचे दिसून येत आहे.