शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदू समाज संघटित आणि बलशाली होणे, या देशाच्या सुरक्षिततेची अन् विकासाची गॅरंटी; कारण...!" - मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
3
IND vs WI : DSP सिराजची 'दबंगगिरी'! कमबॅकमध्ये दिग्गज स्टारच्या पोराच्या पदरी 'भोपळा'
4
पत्नीच्या नावे 'या' योजनेत १ लाख रुपये जमा करा, २ वर्षांनंतर तुम्हाला किती रिटर्न मिळेल? पटापट पाहा डिटेल्स
5
दे दणादण! रस्त्याच्या कडेला स्टॉल लावण्यावरुन भाजपाचे २ नगरसेवक भिडले, झाली हाणामारी
6
बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाला झटका; ४ वेळा आमदार राहिलेल्या नेत्याचा पक्षाला रामराम
7
एलन मस्क बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती! संपत्ती ५०० बिलियन डॉलरवर, इतकी कमाई आली कोठून?
8
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
9
Success Story: १९२९ मध्ये बनवलेलं हे क्रीम, आजही घराघरात होतो वापर; कोलकाताच्या या व्यक्तीनं उभी केली १६० कोटींची कंपनी
10
वडील करणार होते पाचव्यांदा लग्न; संपत्तीसाठी लेकाने काढला काटा, पोलिसांची केली दिशाभूल अन्...
11
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
12
ट्रम्प टॅरिफमुळे भारताच्या प्रगतीला ब्रेक लागेल? रिझर्व्ह बँकेचा इशारा, 'फक्त जीएसटी कपात पुरेशी नाही...'
13
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
14
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
15
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
16
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
17
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
18
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
19
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
20
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?

कोरोनाच्या संकटात संधी शोधून ‘शवदाहिनी’चा स्तुत्य उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:59 IST

जळगाव : आपला देश व राज्य वर्षभर कोरोनाच्या संकटात होते आणि त्या संकटातही संधी शोधली. संकट येतात, मात्र संकटालाही ...

जळगाव : आपला देश व राज्य वर्षभर कोरोनाच्या संकटात होते आणि त्या संकटातही संधी शोधली. संकट येतात, मात्र संकटालाही संधी शोधली पाहिजे. संकटाला संधी शोधून नेरी नाका स्मशानभूमीत जे शवदाहिनी बसविण्याचे काम झाले. हा अतिशय स्तुत्य उपक्रम असल्याचे मत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शवदाहिनीच्या उद्घाटनप्रसंगी केले.

केशवस्मृती प्रतिष्ठानद्वारा नेरी नाका वैकुंठधामात उभारण्यात आलेल्या शवदाहिनीचे उद्घाटन रविवारी सकाळी छत्रपती संभाजी राजे नाट्यगृहात झाले. यावेळी व्यासपीठावर महापौर भारती सोनवणे, आमदार सुरेश भोळे, उपमहापौर सुनील खडके, मनपा स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे-पाटील, मनपाचे विरोधी पक्षनेते सुनील महाजन, केशवस्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरत अमळकर, वैकुंठ शवदाहिनी प्रकल्प प्रमुख नंदू अडवाणी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते शववाहिनी उभारण्याकरिता ज्यांनी मोठी आर्थिक मदत करणाऱ्या उद्योजक रिखबराज बाफनांसह दिलीप चोपडा, हरीश तोलानी यांचा सत्कार करण्यात आला.

इन्फो: दातृत्ववान नागरिकांमुळेच जळगावात शवदाहिनी -भरत अमळकर

भरत अमळकर यांनी रिखबराज बाफना यांनी जळगावातही शवदाहिनी बसविण्याबाबत कल्पना मांडली आणि मोठी आर्थिक मदत केली. बाफनांसह इतर दातृत्ववान नागरिकांमुळेच जळगावात केशव स्मृती प्रतिष्ठानच्या माध्यमातून ही शवदाहिनी कार्यान्वित करण्यात येत असल्याचे सांगितले. सूत्रसंचालन मनीषा खडके यांनी तर आभार नंदू आडवानी यांनी मानले.

इन्फो :

आमदार भोळेंनी स्वीकारली १०० लोकांच्या अंत्यसंस्कारांच्या खर्चाची जबाबदारी

आमदार सुरेश भोळे यांनी निराधार, बेवारस व आर्थिक परिस्थिती हलाखीची असलेल्या एका वर्षात १०० लोकांच्या अंत्यसंस्काराच्या खर्चाची जबाबदारी स्वीकारत असल्याचे सांगितले. तसेच समाजात अनेक गरीब कुटुंबाकडे अंत्यसंस्काराचे साहित्य घेण्यासाठीही पैसे नसतात. त्यामुळे जे बीपीएल रेशन कार्डधारक नागरिक आहेत, त्यांच्यावर मोफत अंत्यसंस्कार करण्याबाबतही मत व्यक्त केले.

इन्फो :

जळगाव ऐपत आणि दानत असणारेही लोक आढळले : आयुक्त

मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी आपल्या मनोगतात, लोकसहभागाशिवाय कुठलाही कार्यक्रम यशस्वी होत नसल्याचे सांगितले. तसेच आपण अनेक शहरात काम केले. परंतु, ‘ऐपत’ अनेकांकडे असते. मात्र, देण्याची ‘दानत’ किती जणांकडे असते, हे माहीत नाही. मात्र, जळगावात ऐपत आणि दानत असणारे आणि दातृत्व असणारे लोक आढळले असल्याचे मत आयुक्तांनी यावेळी व्यक्त केले.